अग्निपथ योजनेविरोधातील आंदोलकांची मुंबई मेलवर दगडफेक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सैन्य भरतीसाठी केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेला देशभरातून तरुणांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला आहे. गुरूवारी उत्तर भारतामध्ये सुरू झालेल्या या विरोधाचे लोण आता दक्षिण भारतापर्यंतही पसरले आहेत. यातच आता बिहारमधील सासाराम आणि भुभुआ स्थानकांदरम्यान अग्निपथ योजनेविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांनी हावडाहून निघालेल्या यूपी मुंबई मेलवर हल्ला (Attack on Mumbai Mail) केला आहे. हल्लेखोरांनी दगडफेक करून लाठ्या-काठ्या आणि बंदुकांनी गाडीवर हल्ला केला.

या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे (Attack on Mumbai Mail) घाबरलेल्या प्रवाशांनी सीटच्या खाली आसरा घेतला. ट्रेनमध्ये बसलेल्या प्रवाशांनी या घटनेचा व्हिडिओही शूट केला आहे. यामध्ये रेल्वे रूळाच्या जवळ उभा असलेले काही लोक प्रवाशांनी भरलेल्या ट्रेनवर दगडफेक (Attack on Mumbai Mail) करताना दिसत आहेत. या हल्ल्यात ट्रेनच्या काचाही फुटल्या आहेत, तर प्रवासी आपला जीव वाचवण्यासाठी सीटखाली बसल्याचे दिसत आहे. या आंदोलनामुळे केंद्र सरकारने तरुणांचा राग शांत करण्यासाठी भरतीच्या वयोमर्यादेत सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ही सवलत केवळ एक वेळसाठी असेल आणि त्यानंतर अग्निपथ योजनेच्या वयोमर्यादेनुसार भरती होईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.

https://twitter.com/RajaramUbhe/status/1537773624182317056

कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून तिन्ही सेवांमधील भरती थांबवण्यात आली होती. त्यामुळे तयारी करताना अनेक तरुण ओव्हरएज झाले. आता अशा तरुणांना दिलासा देण्यासाठी सरकारने त्यांना वयात एकदा सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या, नवीन अग्निपथ योजनेत भरतीसाठी सरकारने वयोमर्यादा 17.5 वर्षे ते 21 वर्षे निश्चित केली आहे. मात्र लवकरच सुरू होणाऱ्या तीन सेवांच्या पहिल्या भरतीमध्ये वयोमर्यादा 23 वर्षांपर्यंत असणार आहे असे संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

हे पण वाचा :
नुपुर शर्माच्या समर्थनात स्टेटस ठेवल्यानं तरुणाला जमावाकडून बेदम मारहाण

‘आता रस्त्यावर पार्क केलेल्या कारचा फोटो पाठवणाऱ्याला मिळणार 500 रुपयांचे बक्षीस’

परळीत बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थ्याला चोरटयांनी लुटले

धक्कादायक ! आश्रममध्ये काम करणाऱ्या 75 वर्षीय वृद्धेवर जीवघेणा हल्ला, काय घडले नेमके?

IND vs ENG : KL Rahul इंग्लंड सीरिजमधून बाहेर, टीम इंडियाला मोठा धक्का!

Leave a Comment