आंबिवली : हॅलो महाराष्ट्र – मुंबईमध्ये लोकलने फुकट प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. कधी कधी हे फुकट करणाऱ्या प्रवाशांना टीसी पकडतात आणि त्यांच्यवर दंड आकारतात. जर त्यांनी दंड नाही भरला तर त्यांना जेलची हवादेखील खावी लागते. याचसंदर्भात मध्य रेल्वेच्या आंबिवली स्थानकात तिकीट तपासत असताना टीसीवर प्रवाशाने ब्लेडने प्राणघातक हल्ला (attack on tc) केला.
काय घडले नेमके?
टीसी सुनील गुप्ता हे सकाळी नऊच्या सुमारास आंबिवली स्थानकातील प्लॅटफॉर्म नंबर दोनवर तर तिकीट तपासात होते. यावेळी एका प्रवाशाला त्यांनी तिकीट दाखवायला सांगितले. त्यावेळी त्या प्रवाशाने खिशातले ब्लेड काढून (attack on tc) टीसी सुनील गुप्ता यांच्या मानेवर वार केले. यानंतर जखमी टीसी सुनील गुप्ता यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रेल्वे पोलिसांचं अशा प्रकारे गुन्हेगारी स्वरूपाचे लोक फिरत असताना दुर्लक्ष होत असल्याचा आरोप प्रवासी संघटनेकडून करण्यात येत आहे. रेल्वे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. हा हल्ला (attack on tc) झाला तेव्हा आंबिवली स्थानकातील सीसीटीव्ही बंद असल्याची माहिती कल्याण कर्जत कसारा रेल्वे संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांच्याकडून देण्यात आली आहे.
हे पण वाचा :
Jio Fiber च्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 14 OTT Apps चे फायदे
Smartphones मधील मागचा कॅमेरा नेहमी डाव्या बाजूलाच का असतो???
PNB च्या खातेधारकांनी लवकरात लवकर पूर्ण करा ‘हे’ काम
RBL Bank च्या ‘या’ क्रेडिट कार्डवरील प्रत्येक ट्रान्सझॅक्शनवर मिळवा 1% कॅशबॅक
मुलांसाठी बचत खाते उघडण्याचे फायदे जाणून घ्या