भोसले गटाची सत्ता : वाठार सोसायटीत सत्तांतर तर बेलवडे बुद्रुक विजयी परंपरा कायम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | कराड दक्षिणमधील वाठार व बेलवडे बुद्रुक येथील विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकीत डाॅ. अतुल भोसले गटाने बाजी मारली आहे. पंचक्रोशीतील नागरिकांचे लक्ष लागून राहिलेल्या वाठार विकास सेवा सोसायटीत राजेश पाटील – वाठारकर समर्थक गटाचा डॉ. अतुल बाबा भोसले गटाने 10-3 असा धुव्वा उडवत सत्तांतर घडवून आणले. तर बेलवडे बुद्रुकमध्ये भोसले गटाने विजयी परंपरा कायम राखत 10/3 असा विजय मिळवला आहे.

कराड दक्षिणमध्ये वाठार व बेलवडे बुद्रुकमधील विकास सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक शुक्रवारी दि. 11 रोजी पार पडली. या निवडणुकीत वाठार विकास सेवा सोसायटीमध्ये डॉ. अतुल भोसले समर्थक म्हसोबा परिवर्तन पॅनेलने 10 जागांवर विजय मिळवत सत्ताधारी राजेश पाटील-वाठारकर समर्थक श्री म्हसोबा शेतकरी विकास पॅनेलचा धुव्वा उडवला असून सत्तांतर घडविले. बेलवडे बुद्रुकमध्ये डॉ. अतुल भोसले समर्थक शेतकरी सभासद सेवा सहकार पॅनेलने रयत विकास पॅनेलचा 10/3 असा पराभव करून आपली सत्ता कायम ठेवली आहे.

वाठारमध्ये 13 जागांसाठी ही निवडणूक लागली होती. सर्व तेरा जागांसाठी मतदान होऊन म्हसोबा परिवर्तन पॅनेलने दहा जागांवर विजय मिळवला. सत्ताधारी गटास फक्त 3 जागांवर समाधान मानावे लागेल. बेलवडे बुद्रुकमध्ये 13 जागांसाठी ही निवड लागली. त्यात सत्ताधाऱ्यांच्या 2 जागा बिनविरोध होऊन 11 जागांसाठी मतदान पार पडले. 11 जागांपैकी आठ जागांवर विजय मिळवत सत्ताधारी पॅनेलने विरोधकांचा 10/3 असा पराभव केला. बेलवडे बुद्रुक विकास सेवा सोसायटीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एफ. एस. गावित यांनी तर वाठार सोसायटीसाठी पी. एम. तायडे यांनी काम पाहिले.

Leave a Comment