ये क्या हो रहा है भाई..? हिट होता होता Boycott झाला ‘राधे’..?; जाणून घ्या कारण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा सुपर डुपर दबंग स्टार सलमान खानचा ‘राधे – युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा सिनेमा कालच ओटीटीवर रिलीज झाला. त्यानंतर भाईजानच्या चाहत्यांनी चित्रपट पाहण्यासाठी एवढे लॉग इन केले कि साईट्स क्रॅश झाल्या. एवढं प्रेम पाहुणचार भाईजानच्या डोळ्यात पण पाणीच आलं असेल. पण दुसरीकडे पाहता चित्र अगदी उलट दिसत आहे. एकीकडे प्रेमाचे तर दुसरीकडे टीकेचे वारे जोरदार वाहताना दिसत आहेत. सोशल मीडियावर या सिनेमाबद्दलचे अनेक ट्रेंड पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे ट्विटरवर चक्क ‘#BoycottRadhe’ हा हॅशटॅग चांगलाच चर्चेत आला आहे. विश्वास बसत नाहीये ना?? पण हेच खर आहे. या हॅशटॅगच्या माध्यमातून लोक ‘राधे’ चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी करीत आहेत. आता ही मागणी कोण करत आहे असं विचारणार असाल.. त्याच त्याच उत्तर दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचे फॅन्स असे आहे.

बॉलिवूड दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर त्याचे फॅन्स बॉलिवूडच्या काही दिग्गज प्रोडक्शन आणि कलाकारांकडे बोट दाखवताना दिसत आहेत. सुशांतच्या मृत्यूमागे याच दिग्गजांचा संबंध आहे असे त्यांचे म्हणणे आहे आणि यापैकीच एक सलमान खान आहे. यामुळे मोठ्या विश्रांतीनंतर सलमानचा सिनेमा रिलीज होताच, सुशांतच्या फॅन्सने नाराजी व्यक्त करण्याची संधी साधली आणि सलमानच्या सिनेमाचा बहिष्कार करण्याचे ठरविले.

परिणामी प्रेक्षकांचा हा संताप सलमानला सहन करावा लागतोय. हे फॅन्स सुशांतचे जरी असले तरी चित्रपटासाठी प्रेक्षक आहेत आणि तेच सलमानच्या सिनेमावर बहिष्कार टाकण्याची मागणी करत आहेत हे ‘राधे’च्या भविष्याकरिता निश्चितच घातक आहे. दरम्यान #BoycottRadhe या हॅशटॅगसह सुशांतच्या फॅन्सने सोशल मीडियावर अनेक पोस्ट केल्या आहेत. यामुळे ‘राधे’चा बहिष्कार करणारा हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करतोय.

‘राधे’बाबत आणखी एक महत्वाची बाबा समोर येतेय ती म्हणजे ‘राधे’ ऑनलाईन लीक झाला आहे. काल हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाल्यानंतर अगदी काहीच तासांत ऑनलाईन लीक करण्यात आला आहे. यामुळे भाईजानचे पैसे देऊन चित्रपट पाहणारे चाहते चांगलेच संतापले आहेत. अनेकांनी तर राधे लीक करणा-यांविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ‘राधे ऑनलाईन लीक झाला आहे. सलमान खान आणि झी स्टुडिओ तुम्ही काय करत आहात? लगेच अ‍ॅक्शन घ्या आणि राधेला वाचवा यार,’ असे एका चाहत्याने म्हटले आहे.

सध्या ‘राधे’ सिनेमावर विविध संमिश्र पद्धतीच्या प्रतिक्रिया मिळत आहेत. समीक्षकांना सिनेमा फारसा भावलेला नाही. पण हा चित्रपट पाहून सलमानच्या चाहत्यांनी नेहमीप्रमाणेच त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तर दुसरीकडे टीकाकारांनी मात्र त्याला सलमानला चांगलाच ट्रोल केला आहे. खरं तर सिनेमातील सलमानची एण्ट्री हा त्याच्या चाहत्यांसाठी कायमच कौतुकाचा विषय असतो. मात्र यावेळी टीकाकारांनी त्याच्या एण्ट्रीसाठीच मिम्स शेअर करीत त्याला चांगलेच ट्रोल केले आहे. एकंदर काय तर सलमानची जादू आता फिकी झाली का काय?? असा प्रश्न उपस्थित राहतोय.

Leave a Comment