औंध पोलिसांकडून चोरीच्या गुन्ह्यात तिघांना अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

औंध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 35000 रूपये किंमतीचे 7 लोखंडी अँगल दि. 19 जुलैला चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यात आलेली होती. या चोरीचा औंध पोलिसांनी छडा लावला असून तिघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अँगल चोरीबाबत गोपनीय बातमीदारा मार्फत गुन्ह्यातील अज्ञात आरोपीची माहिती पोलिसांना मिळाली होती. संशयित आरोपी शब्बीर खलील बागवान (वय- 32,रा. पुसेसावळी, ता. खटाव), विजय बाबा मदने (वय- 42, रा. चोराडे ता. खटाव), संजय जयसिंग चव्हाण (वय- 28, रा. पुसेसावळी ता. खटाव) यांना अटक केली. तसेच त्याचेकडून सदर गुन्हयातील चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बो-हाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख यांचे सुचनेप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक दत्तात्रय पी. दराडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे, पोलीस हवालदार प्रशांत पाटील, पोलीस हवालदार राहुल वाघ, पोलीस नाईक राहुल सरतापे, पोलीस नाईक संतोष पाडळे, पोलीस कॉन्स्टेबल किरण हिरवे यांनी सदरची कारवाई केलेली आहे.