हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात एका पाठोपाठ एक घटना घडताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी दौंड तालुक्यात (7 डिसेंबर 2024) कडेठाण हद्दीमध्ये लताबाई बबन धावडे यांच्यावर बिबट्यानं हल्ला केला होता , अन या घटनेमुळे त्या महिलेचा मृत्यू झाला, अशी घटना समोर आली होती. या घटनेमुळे वनविभागाला भरपाई करावी लागली होती. पण आता या घटनेची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. ज्यात हे सिद्ध झाले आहे कि , महिला अन पुतण्याच्यात अनैतिक संबंध होते , तसेच काही कारणांमुळे पुतण्यानं महिलेला दगडानं ठेचून मारून टाकले . तर हे नेमकं प्रकरण काय हे आज आपण पाहणार राहतो.
दगडानं ठेचून महिलेची हत्या –
मृत महिलेच्या शरीरावरती कोणत्याही वन्य प्राण्यानं हल्ला करून मृत्यू झाला नसल्याबाबतचा प्रादेशिक न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा अहवालात माहिती समोर आली. यानंतर पोलिसांची चौकशी केली त्यानंतर एक गूढ सत्य समोर आलं. लताबाई बबन धावडे शेतात काम करण्यासाठी गेल्या होत्या , त्यांना सतिलाल यान एका बाजूला बोलवले. तो आपल्या पुतण्याच्या घरी काम करतो म्हणून त्या त्याच्यासोबत बांधावर गेल्या. पण काही वेळानी त्यानं त्यांचं तोंड दाबले अन त्यांना बेशुद्ध केलं. यानंतर खरा सूत्रदार आरोपी पुतण्या अनिल पोपट धावडेने दगडानं ठेचून महिलेची हत्या केली होती. तसेच पुतण्याचं काकूशी अनैतिक संबंध होते अशी माहिती या घटनेनंतर उघडकीस आली.
हल्ला बिबट्याने केला असा कांगावा –
महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला असल्याचा दावा त्यावेळी तक्रारदार पुतण्या अनिल धावडेने केला होता. अन याची भरपाई सुद्धा मागितली होती. पण यावर पोलिसानी कसून चौकशी केली अन सिद्ध झालं कि आरोपींनी अनैतिक संबंधाच्या संशयातून लताला मारण्याचा मारले , तसेच हा हल्ला बिबट्याने केला असा कांगावा केला . पण आता त्या दोघानांही पोलिसानी अटक केली आहे.