औरंगाबाद : शहरात 5 आणि ग्रामीणमध्ये 17 नवीन रुग्ण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | गेल्या वर्षांपासून संपूर्ण राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. शुक्रवारी दिवसभरात कोरोनाच्या 22 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये शहरातील 5, तर ग्रामीण भागातील 17 रुग्णांचा समावेश असून एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 47 हजार 949 एवढी झाली असून आतापर्यंत 1 लाख 44 हजार 266 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज पर्यंत 3529 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज 15 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

यामध्ये शहरातील 7 आणि ग्रामीण मधील 8 रुग्णांचा समावेश आहे. औरंगाबाद शहरातील
कोरोनाच्या एकाही रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद नाही.

Leave a Comment