Wednesday, October 5, 2022

Buy now

औरंगाबादच्या विमानतळाचे लवकरच होणार नामकरण

औरंगाबाद – औरंगाबाद, कोल्हापूर, शिर्डी आदी 13 विमानतळांच्या नामकरणाचे प्रस्ताव केंद्र शासनाकडे आले असून, येत्या कॅबिनेटमध्ये याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

केंद्रीय अर्थसंकल्प सादर केल्यानंतर डॉ. कराड यांचे बुधवारी शहरात आगमन झाले त्यावेळी पत्रकारांनी त्यांना विमानतळ नामकरण याप्रकरणी विचारले असता ते म्हणाले, हरदीप सिंग पुरी हे नागरी उड्डयन मंत्री असताना विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे करण्याच्या मागणीचा प्रस्ताव आला होता. त्यांनी तो पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवला. यावर देशात किती विमानतळांचे नामकरण करण्याचे प्रस्ताव आहेत, याची विचारणा पंतप्रधान कार्यालयांनी नागरी उड्डयन मंत्रालयाकडे केली होती. त्यानंतर उदयन मंत्रालयाने प्रत्येक राज्याकडून माहिती मागविल्यानंतर 13 विमानतळांच्या नामकरणाचे प्रस्ताव आले आहेत.

यात महाराष्ट्रातून औरंगाबादसह कोल्हापूर आणि शिर्डी विमानतळाचे प्रस्ताव आहेत. अशी माहिती डॉ. कराड यांनी दिली. खात्याचे विद्यमान मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया लवकरच एकत्रित प्रस्ताव कॅबिनेटसमोर ठेवतील असे डॉ. कराड यांनी सांगितले.