Friday, January 27, 2023

औरंगाबादेत कोरोना रुग्णाचा मृत्यू? व्हाॅट्सअॅपवर डॉक्टरनेंच पसरवली अफवा!

- Advertisement -

औरंगाबाद प्रतिनिधी | शहरातील धूत रुग्णालयात कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाल्याचा मेसेज व्हाॅट्सअॅपवर व्हायरल झाला होता. आता हा मेसेज ही अफवा असल्याचे समोर आले आहे. नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नयेत असे मनपाच्या आरोग्य अधिकारी नीता पडळकर यांनी सांगितले आहे.

चिकलठाणा परिसरातील धूत रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा मेसेज व्हाॅट्सअॅपवर व्हायरल झाला होता. याबाबत आता दोन डाॅक्टरांवर सिडको औद्योगिक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डाॅ.व्यंकटेश उबाळे आणि डॉ.महेश देशपांडे असे आरोपींचे नाव आहेत. वरील दोघांनी व्हाॅट्सअॅपवर मंगळवारी धूत रुग्णालयात कोरोना व्हायरस मुळे एकाचा मृत्यू झाल्याची अफवा पसरवली. धूत रुग्णालय प्रशासनाने ही बाब गांभिर्याने घेत सिडको औद्योगिक पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी तक्रारीची शहानिशा करुन आरोपी डाॅ.उबाळे आणि डॉ.देशपांडे यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करुन रितसर समज देऊन सोडून दिले.

- Advertisement -

या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय इंगळे करंत आहेत. शहरात कोणी अफवा पसरवू नये अशा प्रकारे अफवा पासर्वाणाऱ्यांचे नावे प्रशासनाला कळवावी अफवा पसरविंनार्यावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल असे आवाहन मनपाच्या आरोग्य अधिकारी नीता पडळकर यांनी केले आहे.

ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्याकरता आमच्या 8080944419 या नंबरला Whatsapp करून Hello News असा मॅसेज पाठवा.

या बातम्याही वाचा –

रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर महापालिकेची कारवाई! आकारला दंड

लिंग परिवर्तनानंतर पोलीस कॉन्स्टेबलने केलं मुलीशी लग्न; म्हणाला आता सुखानं जीवन जगू शकेल..

धक्कादायक! विवाहितेवर बलात्कार करून केले व्हिडीओ शुटिंग

राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ४५ वर! कोणत्या महापालिका क्षेत्रात किती रुग्ण पहा..

मालिकेत न्यूड सीन दिल्यानं ‘या’ टीव्ही अ‍ॅक्ट्रेसचा तुटला होता साखरपुडा