औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर ; कोरोना बाधित रुग्णांची संख्या पोहचली 349 वर

औरंगाबाद | शहरात मंगळवारी कोरोना रुग्णांची संख्या 349 एवढी झाली आहे. ज्या भागात रुग्ण सापडले होते. त्या भागात अधिक चाचण्या घेण्याचे धोरण हाती घेतल्याने विषाणू नक्की कोठे आहे, हे समजत आहे. अजूनही कोणाच्या संपर्कातून कोणाला बाधा झाली हे स्पष्टपणे कळत नाही. त्यामुळे प्रतिबंधित भागातून कोणी बाहेर येणार नाही वा जाणार नाही, याची काळजी घेऊन कोरोना चाचणी वाढवत असल्याचे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडाळकर यांनी सांगितले.

औरंगाबाद शहरातील विविध भागातील एकूण 27 रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या 349 झाली आहे. यातील 11 जणांचे मृत्यू झाले असुन 24 जण कोरोनामुक्त झाले. तर एक रुग्ण पुन्हा बाधित झाला. यात नव्या भागांतही बाधित आढळायला सुरुवात झाल्याने शहरवासीयांची चिंता वाढली आहे.

जयभीम नगर (26), अजब नगर (१), संजय नगर (4), बौद्ध नगर (१) बायजीपुरा 4 , किडकपुरा 5, कैलास नगर 4, बजाजनगर 1, उस्मानपुरा 1 पुंडलिक नगर 3, बेगमपुरा 1 या परिसरात 27 नवे रूग्ण आढळले आहेत. असे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने सांगण्यात आले. 27 एप्रिलपासून शहरात दररोज 20 पेक्षा जास्त रूग्ण आढळून येत असल्यामुळे दिवसागणिक करोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

You might also like