हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना संसर्गातून बरे झालेल्या बहुसंख्य रुग्णांना म्युकरमायकोसिसची लागण होत आहे. म्युकरमायकोसिस हा अतिशय भयंकर रोग असून रुग्णांना आपले डोळे गमवावे लागतात. महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांचे प्रमाण जास्त असून आरोग्य यंत्रणेला मिळालेल्या माहितीनुसार म्युकरमायकोसिसने 53 व्यक्तींना आपला जीव गमवावा लागलाय. म्युकरमायकोसिसच्या नव्या माहितीने औरंगाबादेत एकच खळबळ उडाली आहे.
औरंगाबादमध्ये म्युकरमायकोसिसचे 399 रुग्ण असल्याची माहिती गुरुवारी देण्यात आली होती. परंतु एकाच दिवसात तब्बल 177 रुग्णांची भर पडली आहे. ही संख्या शुक्रवारी संध्याकाळपर्यंत 576 वर गेली. आता ही संख्या अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकूणच म्युकरमायकोसिसचा विस्फोट पाहता आरोग्य यंत्रणा हादरुन गेली आहे.
कोरोनानंतर, डायबिटिस असलेले रुग्ण, स्टेरॉइड्च्या जास्त वापरामुळे, ऑक्सिजन बाटल्यांमध्ये डिस्टिल्ड वॉटर वापरण्याकडे दुर्लक्ष यामुळे म्युकरमायकोसिसची लागण होत आहे. प्रकृती गंभीर असलेले कोरोना रुग्ण अनेक दिवस रुग्णालयात असतात. अशावेळी त्यांना म्युकरमायकोसिसची लागण होते. म्युकरमायकोसिस जास्त पसरू नये म्हणून रुग्णांना इंजेक्शन दिले जाते. रुग्णांचा बचाव होईल या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत असल्याचे, तज्ज्ञांनी सांगितले.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.