औरंंगाबाद ग्रामीण पोलीसांची 13 गुन्हेगारांवर “मोक्का” कायद्याअंतर्गत धडक कारवाई…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : औरंगाबाद ग्रामीण पोलीसांनी संघटित गुन्हेगारीवर पोलीसांचा वचक निर्माण करण्यासाठी अधीक्षक मोक्षदा पाटील, पोलीस यांचे मार्गदर्शनाखाली 13 आरोपीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम( मोक्का) अंतर्गत दोषारोप पत्र दाखल करण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे गुन्हेगारी वर्तुळाला नक्कीच हादरा बसला आहे. मोक्का कायद्या अंतर्गत दोषी आरोपींची लवकर सुटका होत नाही. यामुळे या आरोपींना बराच वेळ जेल मध्ये रहावे लागते. ज्यामुळे आरोपींमध्ये मोक्का कायद्याची दहशत निर्माण होते.

पोलीस ठाणे फुलंब्री अंतर्गत साताळा शिवारात असलेल्या राधा गोविंद सेवा मिशन या आश्रमावर पडलेल्या दरोडयाचा तपास करतांना एकुण 13 आरोपींना अटक करण्यात आली होती. सदर गुन्हा आरोपींनी करणसिंग ऊर्फ कन्हैय्या ऊर्फ कन्नु महादु सोळंकी (रा.खडकेश्वर जवळ सांवगी ता. जि.औ.बाद) याने गुन्हेगारांची टोळी तयार करून घटळास्थळाची पाहणी करून गुन्हेगारी कट रचुन आश्रमावर दरोडा टाकल्याचे निष्पन्न झाले. तपासात आरोपी हे पोलीस रेकॉर्डवरील सराईत आणि अट्टल गुन्हेगार असल्याचे तपासात समोर आले आहे.

मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, औरंगाबाद परिक्षेत्र, औरंगाबाद यांनी सदर आरोपी वर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम -1999 (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्याची परवागी दिल्याने गुन्हयात आरोपी विरुद्ध सर्व कायदेशिर प्रक्रिया बिनचुक पुर्ण करून सर्व बाबीचा बारकाईने तपास करून आरोपीविरुद्ध मोक्का न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले आहे.

Leave a Comment