Monday, February 6, 2023

औरंगाबाद ते मुंबई इंडिगोची विमानसेवा 12 जुलैपासून सुरू

- Advertisement -

औरंगाबाद : कोरोनामुळे बंद करण्यात आलेली औरंगाबादची हवाई सेवा पूर्वपदावर येत आहे. 12 जुलै पासून औरंगाबाद ते मुंबई विमानसेवा सुरु करण्यात येत आहे.

हाती आलेल्या माहितीनूसार आठवड्यातून चार दिवस ही सेवा सुरु असेल सोमवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार ही सेवा सुरु राहणार आहे. कोरोनामुळे इंडिगोने औरंगाबादवरून सुरु असलेल्या सर्व सेवा बंद केल्या होती.

- Advertisement -

काही दिवसापूर्वीच इंडिगोने 5 जुलै पासून दिल्ली आणि हैदराबादचे विमान सुरु करण्याचा निर्णय जाहीर केला होता. दिल्लीची विमान सेवा आठवड्यातून तीन दिवस, तर हैदराबादची विमानसेवा आठवड्यातून चार दिवस सुरु राहणार आहे. या दोन्ही विमाना पाठोपाठ आता मुंबईचे विमान सुरु करणायचा निर्णय इंडिगोने घेतला.