लसीकरणात औरंगाबाद जिल्ह्याने मारली मजल…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | अधिकच्या लस पुरवठ्यामुळे चर्चेत आलेल्या जालना जिल्ह्याला प्रत्यक्षात लसीकरणात गती घेता आलेली नाही. लसीकरणात मराठवाड्यात जालना पाचव्या क्रमांकावर आहे, तर औरंगाबाद जिल्हा टॉप वर आहे. मराठवाड्यातील लसीकरणात पुरुष आघाडीवर आहेत. आतापर्यंत 44 टक्के पुरुषांचे लसीकरण झाले आहे, तर लस मिळालेल्या महिलांची संख्या 35 टक्के आहे. कोविन पोर्टल वरील आकड्यांच्या विश्लेषणातून या बाबी समोर आल्या आहेत.

कोरोनाच्या लढाईत लसीकरणाला अतिशय महत्त्व आलेले आहे. लसींच्या तुटवड्याचा सामना अनेक जिल्ह्यांना करावा लागत आहे. दरम्यान, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्वतःच्या जालना जिल्ह्याला अधिकचा लस पुरवठा केल्याची ओरड काही दिवसांपूर्वी झाली होती. अगदी केंद्राच्या आरोग्य सचिव यांनी राज्याच्या आरोग्य सचिवांना पत्र पाठवून याबाबत माहिती मागवली होती. परंतु, मराठवाड्यातील आठही जिल्ह्याच्या लसीकरणाचा आढावा घेतला तर जालना जिल्हा पाचव्या क्रमांकावर असल्याचे समोर आले. औरंगाबाद जिल्हा पहिल्या क्रमांकावर पाठोपाठ नांदेड, लातूर, बीड, जालना, परभणी उस्मानाबाद आणि शेवटी हिंगोलीचा क्रमां

32 टक्के ज्येष्ठ,15 टक्के तरुणांना लस    

आतापर्यंत झालेल्या लसीकरणात मराठवाड्यात 60 वर्षावरील 32 टक्के ज्येष्ठ नागरिकांना लस दिली गेली आहे, तर 45 टक्के ते 60 या वयोगटातील 30 टक्के नागरिकांना लस मिळाली आहे. 18 ते 44 या वयोगटातील लसीकरण सुरू झाले होते मात्र ते लस तुटवड्यामुळे मधेच बंद केले गेले. त्यामुळे मराठवाड्यात आतापर्यंत केवळ 15 टक्के तरुणांना लस मिळाली आहे.

Leave a Comment