सातारा | साताऱ्यात कृष्णानगर येथे घरगुती भांडणात झालेल्या वादावादीत 18 वर्षीय युवतीला शिवीगाळ करत पिस्टल लावून धमकी दिल्या प्रकरणी रमेश ससाणे यांच्यावर सातारा शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी युवतीला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन रमेश ससाणे यांनी केले असल्याची तक्रार संबंधित युवतीने पोलिसांत दिली आहे. याबाबत विनयभंगाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
साताऱ्यातील कृष्णानगर येथे ही घटना 29 ऑगस्ट रोजी घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. युवतीने पिस्टल रोखल्याचे चित्रीकरण मोबाईल मध्ये केलं असून त्यानुसार पोलिसानी गुन्हा नोंद केला आहे. रमेश ससाणे हे सेवानिवृत्ती अधिकारी असून मद्यपान करून हे त्यांनी पिस्टल रोखण्याचे कृत्य केल्याचे मुलीच्या वडिलांनी सांगितले आहे.
यावेळी झटपट झाली असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. सदरील व्हिडिओ आणि तक्रारीने गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले असून अधिक तपास सुरू आहे.