सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
सातारा येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स स्वायत्त महाविद्यालयाचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. शिवाजीराव कदम, कुलपती, भारती विद्यापीठ, पुणे यांनी कला, क्रिडा व संशोधन क्षेत्रात विद्यार्थी व प्राध्यापक यांनी केलेल्या गौरवास्पद कामगिरीचे कौतुक करून यामुळे या महाविद्यालयाचे नाव देश पातळीवर उंचावले आहे असे नमूद केले. सुप्रसिद्ध उद्योजक श्री सुजित जगधणी यांनी अपयशाला न घाबरता सातत्याने प्रयत्न करून यशाला गवसणी घालण्याचे व स्वतःच्या आयुष्याचे जबाबदार तुम्हीच असता याची जाणीव ठेवून आयुष्याची वाटचाल करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षात जागतिक आव्हानांना सामोरं जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्यामधील कौशल्यांचा विकास करण्याची गरज व्यक्त केली. या प्रसंगी शिव छत्रपती अवॉर्ड विजेते बास्केटबॉल कोच व प्राणिशास्त्र विभागाचे माजी विद्यार्थी श्री. अभय चव्हाण यांचा तसेच बायोटेक्नॉलॉजी विभागाची माजी विद्यार्थिनी एव्हरेस्ट वीर प्रियांका मंगेश मोहिते यांचा विशेष सत्कार घेण्यात आला. प्राचार्य डॉ. के.जी. कानडे यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा यानिमित्ताने सादर केला. यावेळी क्रिडा, सांस्कृतिक, एन सी सी, एन एस एस , पारिजातक , संशोधन अशा विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ ए पी तोरणे, प्रा एस आर पोळ, प्रा व्ही एस कोते, प्रा जी आर बाबर यांना बेस्ट टीचर, आर एस सुतार, एस डी कदम यांना गुणवंत सेवक, तसेच बेस्ट डिपार्टमेंट म्हणून संख्याशास्त्र विभाग सिनियर व इलेक्ट्रॉनिक विभाग ज्युनियर यांना देण्यात आला. महाराष्ट्र अकडेमी ऑफ सायन्स तर्फे प्राचार्य डॉ के जी कानडे यांची फेलो व डॉ जे जे चव्हाण यांची यंग अससोसिएट म्हणून निवड झालेबद्दल सत्कार करण्यात आलेतसेच प्रा ए न यादव, प्रा डॉ एच पी उमाप, प्रा डॉ एम ए पाटील यांच्या उल्लेखनीय कामगिरी बद्द्ल सत्कार करण्यात आले.
डॉ पी.व्ही चव्हाण, डॉ. कु.एस. टी गुरमे , डॉ कल्याणी कांबळे, डॉ पवन हांडे यांचा पीएचडी पदवी मिळवल्याबद्दल सत्कार करण्यात आला. शुभम जितुरे यांचा गेट, सेट परीक्षा पास आणि चोनम नॅशनल युनिव्हर्सिटी, साऊथ कोरिया येथे निवड झाल्याबद्दल तसेच कु पी.एस. घोरपडे, कु प्रीतम सोनमले, सुशील यादव, अविनाश सुरवसे कु.प्रियांका माळी, कु.शीतल शेळके, कु.गौरी मोरे यांचा सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्या बद्दल सत्कार करण्यात आला. कु अनम कच्छी हिचा वनस्पती शास्त्र विषयात डॉ जी व्ही जोशी गोल्ड मेडल मिळवल्याबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्राचार्य आर.डी. गायकवाड, डॉ. यु. पी. मुळीक, डॉ. वनिता कारंडे उपप्राचार्य, प्रा जे.ए. वाघ स्टुडंट वेल्फेअर डीन, प्रोफेसर व्ही वाय देशपांडे सर्व विभागांचे डीन, विभागप्रमुख, प्राध्यापक , पालक व विद्यार्थी उपस्थित होते.