रामकृष्ण वेताळ यांना बेळगाव येथील संस्थेचा समाजगाैरव पुरस्कार प्रदान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

बेळगाव येथील राष्ट्रीय ग्रामीण विकास फौंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने दिला जाणारा समाजगौरव पुरस्कार यावर्षी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा महाराष्ट्रचे सचिव रामकृष्ण वेताळ यांना देण्यात आला. दि. ५ सप्टेंबर रोजी बेळगाव येथे झालेल्या समारंभात माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनुर यांचे हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. मानपत्र,सन्मान चिन्ह,प्रशस्तीपत्रक आणि म्हैसूर फेटा असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

या वेळी खासदार अमरसिंह पाटील, ब्रिगेडियर सुधीर सावंत ,बेळगाव एस पी महेश मेघण्णावर,उद्योगपती सुरेश दादा पाटील ,जिल्हा कमांडन्त होम गार्ड बेळगाव अरविंद घत्ती यांची प्रमुख उपस्थिती होती. या पुरस्कारासाठी महाराष्ट्र गोवा व कर्नाटक या तीन राज्यातून लोकांची माहिती मागवली होती. या तीन राज्यातून रामकृष्ण वेताळ यांचे सामाजिक काम लक्षात घेवून निवड करण्यात आली.

रक्तदान, कोरोनाकाळात केलेली मदत, बचत गट सहकार्य, पैलवानांना दिले जाणारे आर्थिक सहाय्य या सर्वांचा विचार करून या आंतरराज्यीय पुरस्कारासाठी त्यांची निवड करून त्यांना सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारासाठी त्यांचे भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे माजी अध्यक्ष अतुल भोसले, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, प्रदेश प्रतिनिधी भरत पाटील, जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मदने, सुरेश कुंभार यांनी आभार मानले.

Leave a Comment