एड्सबाबत प्रबोधन काळाजी गरज : पितांबर ठोंबरे

शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात जागतिक एड्स दिन संपन्न

कराड | एच. आय. व्ही. हा विषाणू धोकादायक आहे. यापासूनच एड्स रोगाची वाढ जगभरात झालेली आहे. इतर रोगाप्रमाणे हाही एक रोग असून त्यामुळे मानसिक सामाजिक समस्या निर्माण झाल्या. हा रोग होऊ नये याची काळजी प्रत्येक नागरिकांनी घेतली पाहिजे. शरीराला पोखरून टाकणारा हा रोग आज औषधोपचार व समुपदेशनाने बरा होऊ शकतो. एड्स बाबतचे प्रबोधन समाजातील आपण सर्वांनी करणे काळाची गरज आहे असल्याचे मत वेणूताई यशवंतराव चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाचे ए. आर. टी समुपदेशक पितांबर ठोंबरे यांनी व्यक्त केले.

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने “जागतिक एड्स दिन” संपन्न झाला. यावेळी ते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी समुपदेशक साै. धनश्री पाटील, प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे, ज्युनियर विभागाचे रा.से.यो कार्यक्रमाधिकारी प्रा. अण्णासाहेब पाटील, प्रा. संभाजी पाटील, वरिष्ठ विभागाचे रा.से.यो सदस्य प्रा. सुरेश काकडे, प्रा. दिपाली वाघमारे आदी उपस्थित होते.

प्रभारी प्राचार्य डाॅ. सतीश घाटगे म्हणाले, एड्स निर्मूलन ही काही वर्षापूर्वी काळाची गरज होती आणि त्यातूनच संयुक्त राष्ट्रसंघाच्या माध्यमातून जागतिक एड्स दिन जगभर साजरा होतो. या रोगाविषयी जनजागृती झाली तरच या वरती प्रतिबंध करता येईल. आज राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने हा एक स्तुत्य उपक्रम महाविद्यालयात होतोय याचा मला आनंद आहे. सर्व विद्यार्थ्यांनी या एड्स जनजागृती सामील होऊन राष्ट्रकार्य केले पाहिजे.

कराड येथील वेणूताई यशवंतराव चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाच्या ए. आर. टी समुपदेशक सौ. धनश्री पाटील यांनी एड्स जनजागृती विषयी मुलांच्या समोर शपथ वाचन केले. सूत्रसंचालन प्रा. शीतल सालवाडगी यांनी केले. प्रास्ताविक प्रा. सुभाष कांबळे यांनी केला. प्रा. सचिन बोलाईकर यांनी आभार मानले.

 

You might also like