अयोध्या प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाने दिली मध्यस्तीसाठी १५ ऑगस्टची मुदत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या राम जन्मभूमी / बाबरी मशीद प्रकरणी मध्यस्ती करण्यासाठी तज्ञ लोकांची समिती नेमली होती. त्या समितीचे अध्यक्ष  न्या. एफ.एम.आय. खलीफुल्ला यांनी आज आपल्या समितीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात  सादर केला आहे. अहवालाचे परीक्षण केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी मध्यस्तीसाठी १५ ऑगस्टची मुदत वाढ दिली आहे.

मोदींच काय, भाजपचा कोणताच नेता २३ मेनंतर पंतप्रधान होणार नाही

‘या’ मतदारसंघात शिवसेनेचा होऊ शकतो ‘धक्कादायक’ पराभव

निवृत्त न्यायाधीश एफ एम कलिफुल्ला यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर, तसेच ज्येष्ठ वकील श्रीराम पांचू हे दोन सदस्य आहेत. याप्रकरणी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठ सुनावणी होत आहे.

महाराष्ट्रातील ‘या’ जागेचा निकाल लागणार सर्वात आधी

समितीने आपला अहवाल ६ मे रोजी सर्वोच्च न्यायालयापुढे मांडला होता. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने  आज १० मे रोजी सुनावणी घेतली आहे. या आधी ८ मार्च रोजी मध्यस्ती करण्यासाठी सर्व धर्मीय आणि तज्ञ लोकांच्या समितीचे गठन करण्यात एके होते.

Leave a Comment