राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त काढणाऱ्या पुजाऱ्याला येत आहेत धमकीचे कॉल 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। उद्या अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. मात्र या संदर्भातील वाद काही कमी होत नाही आहेत. मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त काढणाऱ्या पुजाऱ्याला धमकीचे कॉल आल्याची माहिती समोर आली आहे. शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी भूमिपूजनासाठी ठरविण्यात आलेली वेळ शुभ नसल्याचे म्हंटले आहे. ५ ऑगस्ट ला दक्षिणायन भाद्रपद मास कृष्ण पक्षाची द्वितीय तिथि आहे. शास्त्रांनुसार भाद्रपद महिन्यात गृह, मंदिर या कार्यांची सुरुवात निषिद्ध आहे. असे त्यांनी सांगितले आणि विष्णु धर्म शास्त्र आणि नैवज्ञ वल्लभ ग्रंथ यांचे पुरावे ही दिले आहेत. तसेच काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी देखील या मुहूर्तावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. 

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार कर्नाटकातील बेळगाव या ठिकाणच्या पुजाऱ्याला धमकीचे कॉल येत आहेत. पुजाऱ्यानी देशातील विविध भागातून हे कॉल येत असल्याचा दावा केला आहे. यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस कॉन्स्टेबल ना पाठविण्यात आले आहे. या संदर्भातील अधिकृत तक्रार अद्याप नोंद झाली नसल्याचे बेळगावच्या कमिशनर नि म्हंटले आहे. मात्र पुजाऱ्यांच्या जीवाला धोका असल्याने तिथे पोलीस तैनात करण्यात आले आहेत. कशी च्या काही संतांनी आणि ज्योतिषांनी मंदिराच्या शिलान्यास साठी ठरविण्यात आलेल्या मुहूर्तावर आक्षेप घेतला आहे. त्यांच्या मते मंदिराच्या शिलान्यासाचा जो मुहूर्त ठरविण्यात आला आहे तो त्या दिवसातील सर्वात अशुभ मुहूर्त मानला जातो आहे. शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे शिष्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी देखील  आपल्या फेसबुक पेज वर पोस्ट करत मंदिराच्या शिलान्यासची तिथि अर्थात ५ ऑगस्ट ही तारीख अशुभ असल्याचे म्हंटले आहे.  

मध्य प्रदेश चे माजी मुख्यमंत्री  आणि काँग्रेस चे नेते दिग्विजय सिंह यांनी मंदिर पूजन मुहूर्त आणि  गृह मंत्री अमित शाह  यांच्यासह  मंदिराच्या पुजाऱ्यांना झालेल्या  कोरोना संक्रमणाचा संबंध याच्याशी जोडला आहे. सनातन धर्म हिंदू च्या परंपरांचे उल्लंघन केल्याचा हा परिणाम असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. हे सर्व असले तरी उत्तर प्रदेश मधील अयोध्या येथील या मंदिराच्या भूमिपुजनाच्या कार्यक्रमाची तयारी सुरु झाली आहे. सकाळी ८ वाजल्यापासून राम आरती सोबत हनुमान गुढीचे पूजन सुरु झाले आहे. उद्या अर्थात बुधवारी भूमिपूजन होणार असून पारिजात वृक्षाचे रोपण ही होणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment