Monday, February 6, 2023

भाजपा का बाबा बंगाली; राष्ट्रवादीची मोदींवर सडकून टीका

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात एकीकडे कोरोना, ऑक्सिजनचा तुटवडा, वाढणारे मृत्यू यावरून विरोधक व सत्ताधारी यांच्यात एकमेकांवरती टीका केली जात आहे. अशा परिस्थितीत केंद्रातहि विरोधक व भाजप यांच्यात टीकेचे युद्ध सुरु आहे. भाजपने पश्चिम बंगालमध्ये सत्तेत येताच सर्वांना मोफत सोविड लस देण्याची घोषणा केल्यानंतर यावर राष्ट्रवादीनेही सडकून टीका केली आहे. राष्ट्रवादीने पंतप्रधानमंत्री मोदी यांचा उल्लेख थेट बाबा बंगाली असा केला आहे.

राष्ट्रवादीने केलेल्या ट्विटमध्ये म्हंटल आहे कि, “भाजपा का बाबा बंगाली ! चुटकी बजातेही लशीकरण-वशीकरण, किया कराया? तुरन्त काट ! पोलिटिकल दुश्मन से छुटकारा, इलेक्शन में धोखा, गठबंधन में चोट-निसंकोच संपर्क करें, पार्टी में अनबन? किसानों कि कर्जामुक्ती, आंदोलन यात्रा में रुकावट, जटिल समस्याका थाली बजाके इलाज, गोल्ड मेडालिस्ट (वारानसी)”. अशा शब्दात भाजपने केलेल्या घोषणेचा समाचार घेतला आहे.

- Advertisement -

 

सत्तेत येताच पश्चिम बंगालमधील सर्वांना कोरोनाची लस मोफत देण्याची घोषणा बंगाल भाजपने एक ट्विट करून केली आहे. या ट्विटमध्ये मोदींचा फोटोही शेअर केलेला आहे. त्यावर बंगालीतून कोरोनाची लस मोफत देण्याविषयी म्हटलं आहे. भाजपच्या या ट्विटला रिट्विट करून राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर जोरदार टीका केली आहे. मोदींची तुलना हि बंगाली बाबा अशी करून राष्ट्रवादीने मोदी तसेच भाजपची खिल्ली उडवली आहे.