रशिया जगावर राज्य करेल; बाबा वेंगा यांनी रशिया आणि पुतीनबाबत केलेली भविष्यवाणी चर्चेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रशिया आणि युक्रेन मध्ये गेल्या 2 दिवसांपासून जोरदार युद्ध सुरू असून आज तिसरा दिवस आहे. रशियाने युक्रेनमध्ये आपलं सैन्य घुसवले असून ठिकठिकाणी हल्ले सुरूच आहेत. संयुक्र राष्ट्र, अमेरिका, नाटो या सगळ्यांनी युक्रेनला पाठिंबा दिला आहे. पण रशिया कुणाचंही ऐकायला तयार नाही. या पार्श्वभूमीवर बाल्कनच्या नॉस्ट्राडेमस म्हणून ओळखल्या जाणार्या बाबा वेंगा यांनी कधीकाळी रशिया बाबत केलेल्या एका भविष्यवाणीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

बाबा वेंगा यांनी रशियाविषयी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्याविषयी एक भविष्यवाणी केली होती. भविष्यात रशिया जगावर राज्य करेल आणि युरोपचे रुपांतर ओसाड जमिनीत होईल, असे बाबा वँगा यांनी म्हटले होते. एवढेच नाही, तर ‘सर्व काही बर्फासारखे वितळेल. केवळ एका गोष्टीला कुणी स्पर्षही करू शकणार नाही, ती म्हणजे व्लादिमीर आणि रशियाची शान असे त्यांनी म्हंटल होत.

बाबा वेंगा यांनी ही भविष्यवाणी तब्बल ४३ वर्षापूर्वी केली होती. रशियाला कुणीही रोखू शकणार नाही.’ रशिया आपल्या मार्गातून सर्वांना बाजूला सारेल आणि जगावर राज्य करेल, असेही बाबा वँगा यांनी म्हटले होते. बाबा वेंगा यांनी वर्तवलेल्या अनेक भविष्यवाणी काही अंशी खऱ्या ठरल्याचं दिसून आलं आहे. मात्र काही भविष्यवाण्या खोट्याही ठरल्या आहेत.