राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांना कोरोनाची लागण; उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे

विधान परिषदेचे चे आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे परभणी जिल्हा अध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी यांचा रॅपिड  अॅन्टीजन्ट कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली   असल्याची  माहिती मिळत आहे. या वृत्ताला परभणी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडूनही दुजोरा देण्यात आला आहे.

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड ,आ.धनंजय मुंडे यांच्यानंतर राष्ट्रवादीच्या आणखी एका आमदाराला कोरोना संसर्गाची लागण झाली असून विधान परिषदेचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांची रॅपिड अॅन्टीजन्ट कोरोना संसर्ग चाचणी आज पॉझिटिव्ह आली आहे .त्यामुळे परभणी जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या माहितीला परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दुजोरा दिला आहे.

दरम्यान जिल्ह्यात यापूर्वी तीन वेगवेगळ्या तालुक्यातील नगरसेवकांना कोरोना संसर्गाची लागण झाली होती. आमदार दुर्रानी यांना उपचारासाठी औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान आमदार दुर्रानी यांच्या संपर्कात राहिलेल्या लोकांचा शोध घेणे प्रशासनासमोर आता एक आव्हान असणार आहे.