Monday, February 6, 2023

बाबरमाची येथे जि. प. सदस्य सागर शिवदास यांच्या प्रयत्नातून मंजूर विकासकामांचा शुभारंभ

- Advertisement -

कराड | बाबरमाची (ता. कराड) येथे जिल्हा नियोजन समितीमधून जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या जनसुविधा योजनेमधून ग्रामपंचायत कार्यालयासमोर स्टेज पेव्हर ब्लॉक व सुशोभीकरण करणे या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विजयकुमार कदम, सरपंच सुनिता कदम, उपसरपंच राहुल जांभळे, अमोल पाटील, सुरेश वाघमारे, संगीता शिरतोडे, सुप्रिया माने, भारती कदम, पुनम कुंभार, जेष्ठ नागरिक व मार्गदर्शक आनंदराव पाटील, नेताजी माने, भगवान चंदनशिवे, सुरेश माने, तुकाराम खोचरे, हनुमंत पवार, प्रल्हाद शिरतोडे, शिवाजी पाटील, भगवान माने, दिलीप पवार, जालिंदर कदम, प्रकाश घोरपडे, प्रमोद पवार, प्रदीप माने, सुनील घोरपडे, गजानन माने, बाबुराव कदम, गणेश साळुंखे याच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

- Advertisement -

सागर शिवदास म्हणाले, गावांमध्ये विकास कामासाठी गट न तट बघता गावाच्या विकासाला हातभार लावला जाईल. माझ्या जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावात जास्तीत- जास्त माझ्या सदस्य पदाच्या काळात विकासकामे आणण्याचा माझा प्रयत्न राहिल.