बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक या दिवशी पूर्ण होणार; फडणवीसांची घोषणा

Devendra Fadnavis
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज 6 डिसेंबर, डॉ. बाबासाहेब आंबडेकर महापरिर्निवाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर बाबासाहेबांच्या अनुयायांचा जनसागर उसळला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने आंबेडकरांचे अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. यावेळी इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक कधी पूर्ण होईल याचे अपडेट्स फडणवीसांनी दिले. पुढच्या वर्षी 6 डिसेंबरपर्यंत हे स्मारक पूर्ण करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुढच्या वर्षभरात इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे लोकार्पण करण्याचा आपला मानस आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक हे पुढील महापरिनिर्वाण दिनापर्यंत पूर्ण करण्यात येईल. यामध्ये 450 फूट उंचीचा त्यांचा पुतळा असेल. हे स्मारक डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मारकाचे 50% काम झाले असून पुतळ्याची उभारणी हे प्रकल्पातील आव्हान आहे. शंभर फुटाचा पायथा आणि 350 फूट उंच पुतळा असे एकंदरीत भव्य स्मारक असणार आहे. या स्मारकातील प्रवेशद्वार इमारत, संशोधन केंद्र, वाचनालय, प्रेक्षागृह, वाहनतळाची शंभर टक्के स्ट्रक्चरल कामे झाली आहेत. सध्या या प्रकल्पातील अंतर्गत सजावटीची कामे प्रगतीपथावर असून, बाह्य विकासाची कामेही सुरू झाली आहेत. त्यामुळे येत्या वर्षभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य दिव्य स्मारक खुले होणार आहे असं फडणवीस यांनी म्हंटल.

बाबासाहेबांची वैचारिक दृष्टी मोठी होती. आपल्या देशात समाजात एक प्रचंड मोठी विषमता तयार झाली होती. माणूस म्हणून जगण्याचा अधिकार हिरावून घेतला होता. या विषमतेला आपली शक्ती बनवून बाबासाहेबांनी ज्ञान संपादन केले आणि समाजाला जागृत केल आणि या देशाला संविधान दिले. त्यामुळेच आपला भारत देश प्रगती करू शकला, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला उजाळा दिला