दंगल गर्ल बबिता फोगाटचा पोलिस दलातून राजीनामा, भाजपकडून लढणार विधानसभा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली (वृत्तसंस्थ) | कुस्ती या खेळात भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर रोषण करणारी हरियाणाची महिला कुस्तीपटू बबिता फोगाट ने आपल्या हरियाणा पोलीस पदाचा राजीनामा दिला आहे. या बाबत बबिता यांनी आपल्या वरिष्ठांना 13 ऑगस्ट रोजी पत्र लिहून कळवले होते. अखेर बबिता यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला असून आता त्या भाजप कडून आगामी विधानसभा लढणार असल्याची चर्चा आहे.

बबिता यांनी आपल्या वडिलांसहित ऑगस्ट महिन्यात भाजपात प्रवेश केला होता. येत्या विधानसभेच्या निवडणुकीत उभे राहून बबिता आपल्या सक्रिय राजकारणाला सुरुवात करणार असल्याने तीने आपल्या पोलीस पदाचा राजीनामा दिला असल्याचे बोलले जातंय.

महावीर फोगाट यांनी आपल्या राजकारणाची कारकीर्द जननायक जनता पार्टी (जेजेपी) मधून केली होती. मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांनी जेजेपीला राम राम करत बीजेपीमध्ये प्रवेश केला होता. काश्मीर मधील कलम 370 हटवल्यानंतर त्याच्या समर्थनार्थ बबिता फोगाट यांनी एक ट्विट केले होते. ज्यात त्यांनी म्हंटल होत, की देशाचे स्वातंत्र्य पाहण्याचे भाग्य मला मिळाले. भारत माता की जय, तसेच लठ गाड़ दिया, धुम्मा ठा दिया, अशा खास हरयाणवी शब्दात बबिता यांनी केलेले ट्विट चांगलेच व्हायरल झाले होते.

Leave a Comment