Saturday, June 3, 2023

जिल्हापेक्षा तालुकाच मोठा! बच्चू कडूंच्या प्रयत्नातून तालुका क्रीडा कार्यालयानं केलं जिल्हा क्रीडा कार्यालयाला वाहन भेट

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई

मतदारसंघातील अचलपूर तालुका क्रीडा कार्यालयाने आज जिल्हा क्रीडा कार्यालयाला वाहन भेट दीले आहे. त्यामुळे आता “जिल्हापेक्षा तालुकाच मोठा” ही म्हण आज खरी झालेली आहे. अमरावती जिल्हा क्रीडा कार्यालयाला जिल्हाभर खेळांच्या नियोजनासाठी तसेच विविध स्पर्धेवेळी वेळेवर ऊपस्थित राहण्यासाठी स्वतःचे वाहन ऊपलब्ध नव्हते. त्यामुळं जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यक्रमाला ऊशिरा कींवा अनुपस्थित राहत होते.

ही समस्या लक्षात घेत आमदार बच्चु कडू् यांच्या प्रयत्नातून तालुका क्रीडा कार्यालया अंतर्गत जिल्हाला चारचाकी वाहन भेट देण्याचं ठरलं. त्याची पूर्तता आज वाहन भेट देऊन पूर्ण झाली. प्रशासनिक व्यवस्थेत नेहमी वरून खाली योजना जनतेची काम मार्गी लागत असताना एका तालुक्याने जिल्ह्याची समस्या सोडवण्यासाठी पुढं येन ही कदाचित पहिलीच वेळ असणार आहे.