बच्चू कडू लढणार जालण्यातून लोकसभा, रावसाहेब दाणवेंना देणार टक्कर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती | प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी आपण आगामी लोकसभा निवडणूक जालन्यातून लढणार असल्याचे जाहीर केले आहे. शेतकऱ्यांच्या स्वाभिमानासाठी दानवेंविरोधात जालन्यातून २०१९ लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मैदानात उतरणार असल्याचे कडू यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे आता बच्चू कडू विरुद्ध दानवे अशी लढत येत्या लोकसभेला जालन्यात पहायला मिळणार असून कडू दानवेंना जोरदार टक्कर देतील असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

इतर महत्वाचे –

माझ्यामुळेच नरेंन्द्र मोदी सत्तेत – अण्णा हजारे

प्रकाश आंबेडकरांनी आम्हाला धर्मनिरपेक्षता शिकवू नये – शरद पवार

शेतकऱ्यांना साले म्हणून संबोधणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा पराभव करण्याचा निश्चय बच्चू कडू यांनी केला आहे. ‘शेतकऱ्यांना साले म्हणून संबोधणाऱ्या भाजपच्या रावसाहेब दानवे यांचा पराभव करुनच जालन्यातून परत येईन’, असा पण बच्चू कडू यांनी केला आहे.

मागील वर्षी मार्च २०१७ मध्ये तूर खरेदीवरून रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांना ‘साले’ संबोधले होते. या विधानामुळे शेतकऱ्यांचा अपमान झाला आहे, त्यांच्या जाहीर अपमानाचा बदला म्हणून आपण ही निवडणूक लढवावी, असे जालन्यातील अनेक कार्यकर्ते आणि नेत्यांचे मागणी होती . रावसाहेब दानवे हे १६ व्या लोकसभेत जालन्यातून भाजपचे खासदार असून, १९९९ पासून ते सलग चौथ्यांदा खासदारपदी निवडून आले आहेत.

इतर महत्वाचे –

B.A. पास

दादा कोंडके आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यातला याराना तुम्हाला माहीती आहे का?

जालन्यातून लोकसभा निवडणूक लढणार असल्याचं जाहीर करतानाच, बच्चू कडू यांनी दानवेंवर टीकाही केली आहे. दानवेंच्या मतदारसंघाची अवस्था बिहारपेक्षा वाईट आहे. तिथे रेती तस्करी चालते, तसेच अवैध दारु विक्रीमध्येही दानवेंचा हस्तक्षेप आहे, असा गंभीर आरोप बच्चू कडू यांनी केला.

Leave a Comment