जयपूर : वृत्तसंस्था – राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यात एक धक्क्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आरोपी पत्नीने मद्यधुंद अवस्थेत आपल्या पतीची हत्या केली आहे. संबंधित दाम्प्त्याने आधी एकत्र मद्यपान केलं. त्यानंतर दोघांमध्ये काही कारणावरुन वाद झाला. यानंतर हा वाद वाढल्याने आरोपी पत्नीने मद्यधुंद अवस्थेत आपल्या पतीची हत्या केली. बाडमेरमधील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या आरोपी पत्नीने गळा आवळून आपल्या पतीची हत्या केली आहे. मृत तरुणाच्या आईने आपल्या सुनेविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी आरोपी पत्नी विरोधात गुन्हा दाखल करून तिला ताब्यात घेतले आहे
काय आहे प्रकरण?
मृत व्यक्तीचे नाव अनिल कुमार आहे. आपली सुन मंजूने आपल्या मुलाची हत्या केल्याची तक्रार कुंती यांनी दिली आहे. मंगळवारी रात्री ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह जिल्हा रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवला.
दोघांनाही दारु पिण्याचे व्यसन
संबंधित पती-पत्नी दोघांनाही दारु पिण्याचे व्यसन होते. मंगळवारी रात्रीही दोघं मद्यधुंद अवस्थेत होते. यावेळी दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरुन वाद झाला. या वादातून आरोपी मंजूने आपल्या पतीला झोपेच्या गोळ्या दिल्या. यानंतर तिने आपल्या पतीची बेल्टने गळा आवळून हत्या केली. यानंतर मृत अनिलच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी मंजुची चौकशी केली. तेव्हा तिने आपणच हत्या केली असल्याचे कबुल केले.