साईबाबा देव नाहीतच, कोल्ह्याची कातडी पांघरून ….; बागेश्वर बाबांच्या विधानाने नव्या वादाला तोंड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आचार्य धीरेंद्र कृष्ण शास्त्री बागेश्वर बाबा यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. यावेळी त्यांनी थेट साईबाबा यांच्यावरच भाष्य केलं आहे. साईबाबा हे देव नाहीत. साईबाबा संत आणि फकीर असू शकतात, पण ते देव होऊ शकत नाहीत कारण कोल्ह्याची कातडी धारण करून कोणीही सिंह बनू शकत नाही, असं त्यांनी म्हंटल आहे. त्यांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

जबलपूर येथे बागेश्वर बाबांच्या श्रीमद्भगवत कथेच्या शेवटच्या दिवशी लोकांशी संवाद साधताना भक्तांनी बागेश्वर बाबांना साईबाबांविषयीचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी उत्तर देताना त्यांनी साईबाबांना देव मानण्यास नकार दिला आहे. यावेळी त्यांनी शंकराचार्य यांचे उदाहरण दिले आहे. बागेश्वर बाबा म्हणाले, शंकराचार्यजींना आपल्या धर्मात सर्वात मोठे स्थान आहे. त्यांनी साईबाबांना देवाचे स्थान दिलेले नाही. कोणताही संत महान असू शकतात, युगपुरुष असू शकतात. पण कोणीही देव असू शकत नाही.

ते पुढे म्हणाले, मला साईबाबांवर श्रद्धा असलेल्यांच्या श्रद्धेला धक्का लावायचा नाही. काही लोक माझं मत हे वादग्रस्त ठरवतील. पण सत्य बोलण्याची गरज आहे. कोणीही कोल्ह्याचे कातडे पांघरूण सिंह बनू शकत नाही, हे वास्तव आहे. देव हा देव आहे आणि संत हा संतच राहील असेही बागेश्वर बाबा यांनी म्हंटल. दरम्यान, बागेश्वर बाबा यांच्या साईबाबांविषयीच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.