सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा शहर इतिहासात मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून प्रसिद्ध होते. १७०८ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू छत्रपती शाहूमहाराज यांचा राज्याभिषेक सोहळा सातारा शहरात झाला. त्यानंतर मराठा राज्याच्या अखेरपर्यंत सातारा शहर मराठ्यांची राजधानी होते. या राजधानीच्या शहरातील तामजाईनगर येथे मातीच्या ढिगाऱ्याखाली आतापर्यंत 313 पुरातन नाणी आढळून आली होती. रविवारी दिवसभरात मातीच्या ढिगाऱ्यातून बहामनी कालीन 2 नाणी, खापराचे तुकडे, छोटा शंख, शिवकालीन वीटा सापडल्या आहेत.
सातारच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाकडून पुरातन नाण्याची शोध मोहीम मागील आठवड्यापासून सुरू करण्यात आली आहे. त्या ठिकाणाहून 313 पुरातन नाणी 2 सोनारांकडून ताब्यात घेण्यात आली होती. त्याठिकाणी नाणी शोधण्याची मोहीम संग्रहालय आणि जिज्ञासा मंचच्या वतीने करण्यात आली आहे. रविवारी दिवसभरात पुन्हा शोधमोहिम राबविण्यात आली. यावेळी मातीच्या ढिगाऱ्यातून बहामनी कालीन 2 नाणी, खापराचे तुकडे, छोटा शंख, शिवकालीन वीटा सापडलया.
ऐतिहासिक स्वरूपाच्या नाण्यांचा या अधिकाणी शोध लागत असल्यामुळे पुरातत्व विभागाकडूनही याची दखल घेण्यात आलेली आहे. दरम्यान या ठिकाणी आढळलेली नाही कुठून आली? याबाबत मात्र, शंका नियमन झाल्या आहेत.