Bajaj Pulsar N160 : बजाजची Pulsar N160 नुकतीच लॉंच; पहा किंमत आणि फीचर्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बजाज कंपनीची पल्सर (Bajaj Pulsar N160) ही बाईक नेहमीच तरुणांना आकर्षित करत आली आहे. सुमारे दोन दशकांपूर्वी बजाजने भारतीय बाजारपेठेत पल्सरला लाँच केल . पल्सर भारतात लाँच झाल्यापासून खूप लोकप्रिय ठरली. विशेषत: तरुणांकडून बजाज पल्सरचे सातत्याने कौतुक होत आहे. याच लोकप्रियतेमुळे, बजाजने आत्तापर्यंत वेगवेगळे मॉडेल्स लॉन्च केले आहेत. आता त्यात पल्सर N160 ची भर पडली असून ही दमदार बाईक सध्या जोरदार चर्चेत आहे. चला जाणून घेऊया या बाइकमध्ये काय खास गोष्टी आहेत.

काय आहेत वैशिष्ट्ये आणि डिझाईन-

Pulsar N160 मध्ये पल्सर N250 प्रमाणेच डिझाइन आणि स्टाइल पाहायला मिळत आहे. पल्सर N160ला समोरील बाजूस प्रोजेक्टर एलईडी हेडलैम्प और आइब्रो-स्टाइल एलईडी सह युनिक असे फ्रंट डिझाइन दिले आहे. या बाईकचे मडगार्ड (Bajaj Pulsar N160) आणि अगदी टेलिस्कोपिक सस्पेंशनही पल्सर N250 सारखेच आहे. आहे. तसेच हेडलॅम्प युनिटच्या वर दिलेले स्लिम इन्स्ट्रुमेंटेशन सुद्धा N250 सारखेच आहे आणि त्यात कोणताही बदल नाही. पल्सर N160ला N250 पेक्षा वेगळेपण असणारी एकमेव गोष्ट म्हणजे मागील पॅनलवरील बॅजिंग.

Bajaj Pulsar N160

165cc इंजिन- (Bajaj Pulsar N160)

गाडीच्या इंजिन बाबत बोलायचं झालं तर, Bajaj Pulsar N160 मध्ये 165cc, सिंगल-सिलेंडर, एअर आणि ऑइल-कूल्ड इंजिन आहे. हे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले असून ते 16 पीएस पॉवर आणि 14.65 एनएम पीक टॉर्क जनरेट करते.

Bajaj Pulsar N160

 ब्रेकिंग सिस्टीम-

Bajaj Pulsar N160च्या ब्रेकिंग सिस्टीमबद्दल (Bajaj Pulsar N160) बोलायचे झाले तर त्याच्या पुढच्या आणि मागील चाकांमध्ये डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. या ब्रेकिंग सिस्टीमसोबत सिंगल चॅनल अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम देण्यात आली आहे.

Bajaj Pulsar N160

काय असेल किंमत-

गाडीच्या किमतींबाबत बोलायचं झालं तर Bajaj Pulsar N160 च्या सिंगल-चॅनल ABS व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत १.२२ लाख (Bajaj Pulsar N160) रुपये इतकी असून या बाइकच्या ड्युअल-चॅनल ABS व्हेरिएंटसाठी ग्राहकांना अंदाजे १.२७ लाख रुपये मोजावे लागतील.

हे पण वाचा :

BMW G310 RR : BMWने लाँच केली दमदार बाईक; पहा किंमत आणि फीचर्स

TVS Ronin 225 : बुलेटला टक्कर देणार TVS ची Ronin 225; पहा वैशिष्ट्ये आणि किंमत

Audi A8 L 2022 :बाजारात धुमाकूळ घालणार Audiची A8 L लक्झरी सेडान; BMW, मर्सिडीजला देणार तगडी फाईट

Nothing Phone 1 : Nothing ब्रँड चा पहिला स्मार्टफोन घालणार धुमाकूळ; पहा फिचर्स आणि किंमत

Hyundai Tucson 2022 : ह्युंदाईची नवी Tucson बाजारात लॉन्च; पहा फीचर्स आणि किंमत

Leave a Comment