आम्ही किंगमेकर नाही, किंग बनणार; बाळा नांदगावकर यांचे मोठे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेच्यावतीने आज महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मोठे विधान केले आहे. आम्ही किंगमेकर नाही किंग बनणार आहोत, असे विधान नांदगावकर यांनी केले आहे.

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी मनसे कार्यकर्त्याची आज महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली. यावेळेस आम्ही महापालिकांच्या निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही किंगमेकर नाही तर किंग म्हणून बनणार आहोत, असे विधान नांदगावकर यांनी केले.

आज मनसे कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केलेल्या या विधानानंतर मुंबईत महापालिका निवडनुक मनसे लढवणार असलच्या चर्चांना उधाण आले आहे. नाशिक पुण्याला बैठका सुरु आहेत. तयारीला लोक लागले असल्याचे नांदगावकर यांनी सांगितले.