बाळासाहेब देसाई कारखाना : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते उद्या बॉयलर अग्निप्रदिपन

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या सन 2021-22 च्या 48 व्या गळीत हंगाम व बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ उद्या सकाळी 10.30 वाजता शुक्रवार दि.15 ऑक्टोंबर, 2021 रोजी होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई व स्मितादेवी शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते तसेच  मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई व युवानेते यशराज देसाई यांचे उपस्थितीत कारखाना कार्यस्थळ दौलतनगर (मरळी) येथे कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमानिमित्त कारखान्याचे संचालक पांडूरंग आण्णासो नलवडे व त्यांच्या पत्नी सौ. जयश्री पांडूरंग नलवडे यांचे हस्ते सत्यनारायण महापुजा आयेाजित केली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील यांनी दिली आहे. अशोकराव पाटील म्हणाले, महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई व युवा नेते यशराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली चालू गळीत हंगामाची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली आहे. कारखान्यामधील मशिनरी ओव्हर ऑईलिंग व रिपेअरिंगची कामे पुर्णत्वाकडे आली आहेत. तसेच ऊस तोडणी व वाहतूकीसाठी आवश्यक तेवढया तोडणी मजूर यंत्रणेचे नियोजन झालेले असून या गळीत हंगामाध्ये कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद व बिगर ऊस उत्पादक सभासद यांनी कारखान्याचे शेती विभागाकडे नोंदवण्यात आलेल्या संपूर्ण ऊसाचे गाळप करण्याच्या दृष्टीने सर्व ते नियोजन झाले आहे. ऊस उत्पादक सभासद व शेतकरी या सर्वांच्या सांघिक प्रयत्नातून व सहकार्यातून यंदाचाही गळीत हंगाम यशस्वी होईल.

उद्या सकाळी कोरोना संसर्गाचे पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या नियामांचे पालन करीत कारखान्याचे संचालक मंडळ, ऊस उत्पादक सभासद,शेतकरी,पदाधिकारी व कार्यकर्ते,अधिकारी व कर्मचारी यांचे उपस्थितीत कारखाना कार्यस्थळ, दौलतनगर (मरळी) येथे संपन्न होणार आहे.

You might also like