‘…म्हणून बाळासाहेब कायम स्मरणात राहतील’; मोदींनी जागवल्या आठवणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 96 वी जयंती. जयंतीनिमित्त राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्वीटरच्या माध्यमातून बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे. तसेच “सदैव जनतेच्या पाठीशी उभा राहणारा उत्कृष्ट नेता म्हणून ते कायम स्मरणात राहतील,” असे गौरवोद्गार मोदींनी काढले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “मी श्री बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो. सदैव जनतेच्या पाठीशी उभा राहणारा उत्कृष्ट नेता म्हणून ते कायम स्मरणात राहतील,”

दरम्यान शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 96 वा जन्मदिन असून यानिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी मुंबईतील शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळी सकाळपासूनच शिवसेना नेते व शिवसैनिक दाखल होत आहेत. पंतप्रधान मोदी यांनीही बाळासाहेबांच्या स्मृतींना उजाळा दिला. पंतप्रधानांनी आपल्या वैयक्तिक ट्वीटर हँडलवरून ट्वीट करीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

गुजरातच्या दंगलीवेळी बाळासाहेब ठाकरेंनी केली होती मोदींची पाठराखण

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत सांगायचे झाले तर दोघांचे अत्यंत जिव्हाळ्याचे नाते राहिले होते. गुजरातमध्ये जेव्हा दंगली उसळल्या तेव्हा मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी मोदींच्या मुख्यमंत्रिपदावर टांगती तलवार होती. मोदींना हटवण्याची तयारी पक्षनेतृत्वाने केली होती. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे हे मोदींच्या पाठीशी उभे राहिले होते. मोदींना हटवले तर गुजरात हातचे जाईल, असे ठाकरेंनी सांगितले होते. मातोश्री निवासस्थानीही मोदी बाळासाहेबांच्या भेटीला आले होते.

Leave a Comment