Friday, June 2, 2023

बंडातात्या कराडकर सातारा पोलिसांच्या ताब्यात

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके

ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. यावरून आज सकाळी सातारा पोलीसांनी बंडातात्या कराडकर यांच्या फलटण तालुक्यातील पिंपरजमधील मठात जाऊन चौकशी केली त्यानंतर त्यांना ताब्यात घेतले.

सातारा येथे काल बंडातात्या कराडकर यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी राज्य महिला आयोगाच्यावतीने सातारा पोलिसांकडे चौकशीची मागणी करण्यात आली. त्यानंतर आज सकाळी सातारा पोलिस बंडातात्या कराडकरांच्या फलटण तालुक्यातील पिंप्रद येथील राष्ट्र संत गुरुवर्य दिक्षित मठात दाखल झाले. दोन तासानंतर पोलिसांनी बंडातात्या कराडकर यांना ताब्यात घेतले असून त्यांना 12 वाजेपर्यंत सातारा शहर पोलिस ठाण्यात आणले जाणार आहे.

विनापरवाना जमाव जमवून आंदोलन केल्या प्रकरणी बंडातात्या कराडकर यांच्यासह 125 जणांविरोधात सातारा शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी काल सातारा येथे सुपरमार्केटमध्ये वाइन विक्री करण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन केले होते.