बंधन बॅंक दरोडा : अधिकाऱ्यांच्या डोळ्यात चाैघांनी चटणीची पूड टाकली तर आरोपी दोनच

फलटण | बंधन बँकेमध्ये रिलेशनशिप ऑफिसर असलेल्या समाधान बजाळे याला दुचाकीवरून आलेल्या चाैघांनी लुटल्याची घटना घडली. या घटनेनंतर फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आलेली होती. तक्रारीत बॅंक अधिकाऱ्यांने दोन मोटार सायकलीवरून आलेल्या चाैघांनी पाठलाग करून डोळ्यात चटणीची पूड टाकल्याचे म्हटले होते. या दरोड्याचा पर्दापाश केला असून फलटण पोलिसांनी समाधान भिमराव वजाळे (वय- 23, सध्या रा. फलटण, मुळ रा. अकलूज, जि. सोलापूर) व महंम्मद हमीद नदीफ मोमीन (वय- 22, रा. अकलूज, जि. सोलापूर) अशी अटक केलेली संशयितांची नावे आहेत.

याबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, बंधन बँकेच्या फलटण शाखेमध्ये रिलेशनशिप ऑफिसर म्हणून नोकरीस असलेले समाधान बजाळे यांने दि.22 फेब्रुवारी 2022 रोजी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीत दि. 22 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी तो बंधन बँकेच्या कलेक्शनचे 73 हजार 465 रुपये घेऊन अलगुडेवाडीहून गोखळी गावच्या दिशेने जात होता. दरम्यान, दोन मोटार सायकलींवरुन आलेल्या चौघांनी त्यांचा पाठलाग करुन त्याच्या डोळ्यात चटणीची पुड टाकून रक्कम लंपास केल्याचे म्हटले होते. या तक्रारीवरुन पोलिस तपास करत होते. तपासा दरम्यान पोलिसांना या प्रकरणात समाधान वजाळेचा सहभाग असल्याचे

दिसून आले. त्यांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने या गुन्ह्याच कबुली दिली. समाधान वजाळे याने बंधन बँकेच्या गोळा केलेल्या कर्जाच्य हप्त्यांची रक्कम हडप करण्याच्य दृष्टीने त्याच्या गावाकडील मित्र महंम्मद मोमीन याला फलटणमध्ये बोलावून घेतले होते. त्यानंतर दोघांनी दरोड्याचा बनाव केला. ठरल्यानुसार महंम्मद मोमीन हा पैसे घेऊन गेल्यानंत समाधान वजाळे याने दुकानातून चटणीची पुड विकत घेऊन ती स्वत च्या डोळ्यावर टाकल्याचा बनाव केला. त्यानंतर फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात खोटी तक्रार दिली. याप्रकरण फलटण पोलिसांनी समाधान बजा याच्यासह त्याचा साथीदार असलेल्य महंम्मद मोमीन याला अटक करण्यात आली. तपास सपोनि अक्षय सोनवणे करत आहेत.