हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank FD Rate – यंदाच्या अर्थसंकल्पातून अनेक लोकांना कर सवलतीतून मोठा दिलासा मिळाला आहे. या बजेटनंतर आता सर्वांचे लक्ष केंद्रिय बँक, रिझर्व्ह बँकेच्या (RBI) चलनविषयक धोरण बैठकीकडे लागले आहे. या महत्त्वपूर्ण बैठकीची तारीख 7 फेब्रुवारी 2025 आहे. यापूर्वीच, 5 प्रमुख बँकांनी आपल्या एफडी (फिक्स्ड डिपॉझिट) व्याजदरात मोठे बदल केले आहेत. तर ते कोणते बदल आहेत याची आज आपण माहिती घेणार आहोत. चला तर त्याबद्दल अधिक जाणून घेऊयात.
पंजाब नॅशनल बँक (PNB) –
पंजाब नॅशनल बँकेने 303 दिवसांच्या एफडीसाठी (FD) 7% आणि 506 दिवसांच्या एफडीसाठी 6.7% व्याजदर लागू केला आहे. याशिवाय, PNB आता 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडीसाठी 3.50% ते 7.25% पर्यंत व्याज देत आहे. 400 दिवसांच्या एफडीवरील व्याजदर 7.25% आहे. हे नवीन व्याजदर 1 जानेवारी 2025 पासून लागू झाले आहेत.
युनियन बँक ऑफ इंडिया (Bank FD Rate)-
युनियन बँक ऑफ इंडियाने 3 कोटी रुपयांपेक्षा कमी रक्कम असलेल्या एफडीवरील व्याजदरात बदल केला आहे. आता 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडीसाठी 3.50% ते 7.30% पर्यंत व्याज मिळेल. 456 दिवसांच्या एफडीवर सर्वाधिक 7.30% व्याजदर लागू होईल. नवीन व्याजदर 1 जानेवारी 2025 पासून लागू झाले आहेत.
शिवालिक स्मॉल फायनान्स बँक (SFB) –
शिवालिक स्मॉल फायनान्स बँकेने 22 जानेवारीपासून एफडीवरील व्याजदरात सुधारणा केली आहे. सामान्य नागरिकांसाठी व्याजदर 3.50% ते 8.80% असतील, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 4% ते 9.30% पर्यंत व्याज मिळेल.
Axis बँक –
बँकेचे नवीन व्याजदर 27 जानेवारीपासून लागू झाले आहेत. 3 कोटी रुपयांपेक्षा कमी निधीसाठी, Axis बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षाच्या कालावधीसाठी सामान्य नागरिकांना 3 % ते 7.25 % व्याज देत आहे.
कर्नाटक बँक (Bank FD Rate)-
कर्नाटक बँकेने (Bank FD Rate) 7 दिवसांपासून 10 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 3.50% ते 7.50% पर्यंत व्याज देण्याची घोषणा केली आहे. सर्वाधिक व्याज 375 दिवसांच्या एफडीवर 7.50% आहे. नवीन दर 2 जानेवारी 2025 पासून लागू होतात. या सर्व बदलांनंतर, बँकांनी दिलेल्या नवीन व्याजदराचा फायदा अनेक बचत करणाऱ्यांना होणार आहे.