Bank Holiday : मे महिन्यात बँका 12 दिवस बंद राहणार, सुट्ट्यांची संपूर्ण लिस्ट पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । मे महिन्यात बँका 12 दिवस बंद राहतील. मे महिन्यात कामगार दिन, अक्षय्य तृतीया, ईद, बुद्ध पौर्णिमा, परशुराम जयंती आणि रवींद्रनाथ टागोर जयंती यांसारख्या प्रसंगी बँकांना सुट्ट्या असतील. या सुट्यांमध्ये शनिवार आणि रविवार सारख्या आठवड्याच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे.Bank Holiday

रिझर्व्ह बँकेने दिलेल्या लिस्टनुसार या सर्व सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या असतील. त्यामुळे बँकेत जाण्यापूर्वी तुमच्या संबंधित राज्यांतील बँकांच्या सुट्ट्यांची माहिती घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. खाली दिलेली सुट्ट्यांची संपूर्ण लिस्ट पहा.

1 मे (रविवार) : महाराष्ट्र दिन

2 मे (सोमवार): रमजान ईद / ईद उल फित्र (केरळमध्ये बँका बंद)

3 मे (मंगळवार): भगवान श्री परशुराम जयंती / रमजान ईद (ईद-उल-फित्र) / बसव जयंती / अक्षय तृतीया (केरळ वगळता देशातील इतर राज्यांमध्ये बँका बंद)

8 मे : रविवार

9 मे (सोमवार): रवींद्रनाथ टागोर जयंती (पश्चिम बंगाल आणि त्रिपुरामध्ये बँका बंद)

14 मे (शनिवार): महिन्याचा दुसरा शनिवार

15 मे : रविवार

16 मे (सोमवार): बुद्ध पौर्णिमा, सिक्कीम डे (देशातील सर्व राज्यांमध्ये बँका बंद)

22 मे : रविवार

24 मे (मंगळवार): काझी नजरुल इस्लाम जयंती (सिक्कीममध्ये बँका बंद)

28 मे (शनिवार): महिन्याचा चौथा शनिवार

29 मे : रविवार

रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, या सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये समान प्रमाणात लागू होणार नाहीत. या सुट्ट्यांमध्ये, ग्राहक ऑनलाइन बँकिंग, फोन बँकिंग आणि UPI द्वारे त्यांचे आर्थिक व्यवहार पूर्ण करू शकतात.

Leave a Comment