Bank Holiday : या महिन्यात 13 दिवस बँका राहणार बंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीमध्ये आजनंतर 13 दिवस सरकारी आणि खासगी बँकांमध्ये कोणतेही कामकाज होणार नाही. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या सुट्ट्यांच्या लिस्ट नुसार, फेब्रुवारीतील 12 दिवस बँकांच्या सुट्ट्यांमुळे बंद राहणार आहेत. त्याचबरोबर फेब्रुवारीमध्ये कामगार संघटनांनी दोन दिवस संपाची घोषणा केली आहे.

फेब्रुवारीमध्ये, एकूण 12 दिवसांच्या बँक सुट्ट्यांपैकी 4 सुट्ट्या रविवारी असतात. यातील अनेक सुट्ट्याही सातत्याने पडणार आहेत. RBI च्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या सुट्टीच्या लिस्ट नुसार, या सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशी आहेत. या सर्व सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये एकाच वेळी लागू होणार नाहीत. त्याच वेळी, RBI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, रविवार व्यतिरिक्त महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात.

बँका बंद असल्याचा सर्वाधिक फटका अशा ग्राहकांना बसणार आहे, ज्यांना स्वत: बँकेत जाऊन कामे करून घ्यावी लागतात. मात्र, ऑनलाइन बँकिंग सर्व्हिस आठवड्याच्या शेवटीही सुरू राहतील, ज्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. RBI ने अलीकडेच लागू केलेल्या नवीन नियमांमुळे NEFT आणि इतर ऑनलाइन चॅनेल सुट्टीच्या दिवशीही काम करतात.

2 दिवसांचा बँक संप
बँक कर्मचाऱ्यांनीही 23 फेब्रुवारी आणि 24 फेब्रुवारीला संपाची घोषणा केली आहे. सेंट्रल ट्रेड युनियन (CTU) आणि ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA) सह इतर संघटनांनी संयुक्तपणे बँक संपाची घोषणा केली आहे, ज्यामध्ये देशभरातील सर्व सरकारी आणि खाजगी बँकांचा समावेश असेल. त्यामुळे संप झाल्यास 23 ते 27 फेब्रुवारी असे 4 दिवस कामकाज होणार नाही. कारण 23 आणि 24 फेब्रुवारीला संघटना संपावर राहिल्यास फेब्रुवारीत 23 ते 27 म्हणजे 5 दिवसांपैकी 4 दिवस बँकांमधील कामकाज ठप्प होणार आहे. 23 आणि 24 आणि 26-27 फेब्रुवारीला अनुक्रमे चौथा शनिवार आणि रविवार असल्याने बँकेत कोणतेही काम होणार नाही.

‘या’ तारखांना सुट्टी असेल

5 फेब्रुवारी       सरस्वती पूजा/वसंत पंचमी (हरियाणा, ओडिशा, पंजाब, पश्चिम बंगालमध्ये सुट्टी.
6 फेब्रुवारी       रविवार
12 फेब्रुवारी     दुसरा शनिवार
13 फेब्रुवारी     रविवार
15 फेब्रुवारी     हजरत अली जयंती/लुई-नगाई-नी (उत्तर प्रदेश आणि मणिपूरमध्ये बँका बंद)
16 फेब्रुवारी     गुरु रविदास जयंती (चंदीगड, हिमाचल, हरियाणा आणि पंजाबमध्ये बँका बंद)
18 फेब्रुवारी     डोलयात्रा (पश्चिम बंगालमध्ये बँका बंद)
19 फेब्रुवारी     छत्रपती शिवाजी महाराज जयंती (महाराष्ट्रातील बँका बंद)
20 फेब्रुवारी     रविवार
23 फेब्रुवारी     बँक संप
24 फेब्रुवारी     बँक संप
26 फेब्रुवारी     चौथा शनिवार
27 फेब्रुवारी     रविवार

Leave a Comment