मार्चमध्ये ‘या’ 11 दिवशी देशातील बँका राहणार बंद!

नवी दिल्ली । फेब्रुवारी महिना संपत असून पुढील मार्च महिन्यात देशातील सर्व बँकांना ही 11 दिवसांची सुट्टी राहणार आहे. फक्त वेगवेगळ्या राज्यात या सुट्ट्या वेगवेगळ्या दिवशी असतील. काही राज्यांत, स्थानिक सणांच्या आधारे बँकांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात येतील. त्यामुळं पुढच्या मार्च (march) साठी बँकेशी संबंधित कोणतीही कामं करण्याचा किंवा या महिन्यातील कामे पुढे ढकलण्याचा विचार करत असल्यास कॅलेंडर एकदा नक्कीच पाहा.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) हॉलिडे कॅलेंडरनुसार, मार्चमध्ये होळी आणि महाशिवरात्रीसह एकूण 11 दिवस बँकांना सुट्टी असेल. यापैकी 5 मार्च, 11 मार्च, 22 मार्च, 29 मार्च आणि 30 मार्च रोजी बँकांना सुट्टी असेल. त्याशिवाय 4 रविवार आणि 2 शनिवारीही बँका बंद राहतील. म्हणजेच मार्च महिन्यात एकूण 11 दिवस बँकांमध्ये काम होणार नाही.

मार्चमध्ये या दिवशी राहणार बँकाना सुट्टी 

5 मार्च, शुक्रवार, फक्त मिझोरममध्ये सुट्टी
7 मार्च, रविवार
11 मार्च, गुरुवार, महाशिवरात्री
13 मार्च, दुसरा शनिवार
14 मार्च, रविवार
21 मार्च, रविवार
22 मार्च, सोमवार, बिहार दिन, फक्त बिहारमध्ये सुटी
27 मार्च, चौथा शनिवार
28 मार्च, रविवार, होळी
29 मार्च, सोमवार, धूलिवंदन

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

You might also like