व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

Bank of Maharashtra कडून कर्ज घेणे महागले, बँकेने MCLR मध्ये 0.20 टक्क्यांनी केली वाढ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank of Maharashtra : RBI कडून नुकतेच रेपो दरात वाढ केली गेली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. आता या लिस्टमध्ये आणखी एका बँकेचे नाव जोडले गेले आहे. Bank of Maharashtra ने ग्राहकांना मोठा धक्का देत आपल्या विविध कालावधीसाठी मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) 20 बेस पॉइंट्स किंवा 0.20 टक्क्यांनी वाढवला आहे. ज्यामुळे आता बँकेकडून कर्ज घेणे महाग होणार आहे. बँकेचे नवीन दर 10 ऑक्टोबर 2022 पासून लागू झाले आहेत.

Bank of Maharashtra slashes lending rate by up to 0.1%

EMI मध्ये होणार वाढ

Bank of Maharashtra च्या MCLR वाढल्याने टर्म लोनवरील EMI मध्येही वाढ होण्याची अपेक्षा आहे. हे लक्षात घ्या की बहुतेक कंझ्युमर लोन हे एका वर्षाच्या MCLR वर आधारित असतात. अशा परिस्थितीत, MCLR मध्ये वाढ झाल्यामुळे पर्सनल लोन, ऑटो आणि होम लोन महागण्याची शक्यता आहे.

10 ऑक्टोबर पासून बँकेचा एक वर्षाचा MCLR दर 7.80 टक्के असेल. पूर्वी तो 7.60 टक्के होता. तसेच एक दिवसापासून ते 6 महिन्यांपर्यंतचा MCLR देखील 0.20 टक्क्यांनी वाढवून 7.30 वरून 7.70 टक्के करण्यात आला आहे.

Bank of Maharashtra may see rise in customer defaults due to pandemic impact | Mint

MCLR काय आहे ???

MCLR ही RBI कडून विकसित करण्यात आलेली एक पद्धत आहे ज्याआधारे बँका कर्जासाठी व्याजदर ठरवतात. याआधी सर्व बँका बेस रेटच्या आधारे ग्राहकांसाठीचे व्याजदर निश्चित करत असत. Bank of Maharashtra

rbi on cryptocurrency: RBI to seek review of Supreme Court order on cryptocurrency - The Economic Times

रेपो रेट गेल्या 3 वर्षांच्या उच्चांकावर

अलीकडेच, RBI ने आपल्या द्वि-मासिक पतधोरण आढाव्यात रेपो दर 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.9 टक्क्यांवर नेला. हा त्याचा 3 वर्षाचा उच्चांक आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. Bank of Maharashtra

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://bankofmaharashtra.in/retail-interest-rates

हे पण वाचा :
FD Rates : ‘या’ बँकांच्या एफडीवर मिळेल 7 टक्क्यांहून जास्त व्याज, व्याज दर तपासा
Train Cancelled : रेल्वेकडून आज 145 गाड्या रद्द !!! रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट तपासा
Whatsapp आणणार नवं फीचर्स; ग्रुप मेम्बर्सची संख्या 1024 होणार
‘या’ सरकारी बँकेकडून Home Loan वरील व्याजदरात मिळत आहे सूट
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर तपासा