बावधनकरांना बगाड यात्रा आली अंगलट; तब्बल गावातील 61 जण कोरोनाबाधित

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यातील बावधन येथे प्रशासनाचे आदेश झुगारून मोठी गर्दी करून यात्रा साजरी करण्यात आली होती. गर्दी जमवून प्रशासनाचे आदेश झुगारणे बावधनकरांना चांगलेच महागात पडू लागले आहे. बगाड यात्रेनंतर तब्बल 61 जण कोरणा बाधित आढळून आले आहेत.

राज्यातील सर्वात मोठे बगाड पाहण्यासाठी येथे दरवर्षी लाखो भाविक हजेरी करत असतात. चालू वर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जमावबंदी जाहीर केली होती. परंतु काही लोकांनी जमावबंदी झुगारून यात्रा मोठ्या प्रमाणात साजरी केली होती. त्यानंतर पोलिस प्रशासनाने 100 हून अधिक लोकांच्यावर गुन्हे दाखल केले. परंतु प्रशासनाचे आदेश झुगारून यात्रा करणे, बावधन येथील लोकांना आता महागात पडू लागले आहे. कारण येथे कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली आहे.

बावधन येथील बगाड यात्रेनंतर जमलेल्या गर्दीचा परिणाम आता गावातील लोक कोरोनाबाधित होत असल्याचे दिसून येऊ लागला आहे. त्यामुळे प्रशासनाचा आदेश झुगारणे बावधनकरांच्या अंगलट येऊ लागले आहे.

You might also like