….तरच ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रोहितचा विचार करण्यात येईल ; सौरव गांगुलीचे मोठं विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल संपल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौरा करणार आहे. 27 नोव्हेंबरपासून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड झाली असून धक्कादायक म्हणजे भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्माला या दौऱ्यासाठी वगळण्यात आले आहे. रोहित शर्मा दुखापतग्रस्त असल्याने त्याची निवड केली गेली नाही असं सांगण्यात येत आहे. याबाबत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी महत्वाचे विधान केले असून जर रोहित फिट असेल तर नक्की त्याचा विचार करण्यात येईल असं म्हंटल आहे.

गांगुली म्हणाले की, ऑस्ट्रेलियामध्ये या संघाविरुद्ध खेळणं नेहमीच आव्हानात्मक असते. स्मिथ आणि वॉर्नर संघात असल्यामुळे संघ आणखी मजबूत असेल. भारतीय संघासाठी ही महत्त्वाची परीक्षा असेल. यावेळी भारतीय संघाची निवड करताना अनुभवी आणि युवा अशा दोन्ही खेळाडूंनी संधी दिली आहे. मात्र हिटमॅन रोहित शर्मा आणि इशांत शर्मा यांची निवड करण्यात आलेली नाही आहे.

दोन्ही खेळाडू जमखी आहे. एकीकडे रोहित शर्मा आयपीएलसाठी युएइमध्ये आहे. रोहित सराव करताना दिसत असला तरी त्यानं गेले 3 सामने खेळळे नाही आहेत. त्यामुळे रोहित आणि इशांतबाबत विचारले असता गांगुली म्हणाला की, ” आम्ही इशांत आणि रोहितवर लक्ष ठेवून आहोत. इशांत पूर्णत: आउट झाला नाही आहे, कसोटी मालिकेसाठी त्याला संघात घेऊ शकतो. रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी फिट व्हावा असे आम्हाला वाचते, जर तो फिट असेल तर नक्की त्याचा विचार होईल”सौरव गांगुली यांनी म्हंटल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment