सावधान ! शहरात सात दिवसात 38 बालके कोरोना बाधित

औरंगाबाद | कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेत बालकांना अधिक धोका असण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. मात्र दुसर्‍या लाटेत ही शहरातील 0 ते 18 वर्षे वयोगटातील सुमारे तीन हजार मुलांना कोरोना झाल्याची मनपाकडे नोंद आहे. आता संसर्ग कमी झाला असला तरी मागील सात दिवसात 0 ते 18 वयोगटातील केवळ 38 मुले बाधित आढळली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दीड महिन्यात शून्य ते पाच वर्षे वयोगटातील 465 तर पाच ते 18 वयोगटातील 2,415 मुलांना कोरोना ची बाधा झाली. दीड महिन्यात तब्बल 2,879 मुले बाधित आढळल्याने प्रशासनाची चिंता वाढली होती. मात्र, दुसरी लाट ओसरताच बाधित मुलांचे प्रमाणही घटले आहे.1 ते 7 जून दरम्यान केवळ 38 मुले पॉझिटिव्ह निघाली.

आजवर 9,115 मुले पॉझिटिव्ह
आजवर शहरात 9,115 मुले बाधित झाली. यात शून्य ते पाच वयोगटातील 1,392 मुलांचा समावेश आहे. पाच ते 18 वयोगटातील 7,803 तसेच सोमवारी शून्य ते पाच वयोगटातील एक आणि पाच ते 18 वयोगटातील 3 अशी 4 मुले बाधित निघाली.

You might also like