शेतकऱ्यांचे तहसील कार्यालयात झोपा आंदोलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड प्रतिनिधी। आपण बरीच आंदोलन ऐकली आणि पाहली असतील पण बीडमधील एका आंदोलनाने प्रशासनाची झोप उडवली आहे. यंदा मराठवाड्यात म्हणावा तसा पाऊस झाला नाही. त्यामुळे दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत सरकारने दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी केज तालुक्यातील अनेक गावच्या हजारो शेतकऱ्यांनी एकत्र येऊन तहसील कार्यालयात बेमुदत झोपा आंदोलन सुरु केल. एक दोन नाही तर हजारो लोक तहसील कार्यालयात येवून झोपत होते. यामुळे प्रशासनाची चांगली भांबेरी उडाली.

अधिकाऱ्यांना ये जा करता येईना यामुळे तहसीलदारानी तत्काळ उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांना बोलावून शेवटी लेखी आश्वासन दिल्यानंतरच तब्बल 3 तासांनंतर हे अनोखे झोप आंदोलन मागे घेण्यात आले. तेव्हा कुठे प्रशासनान सूटकेचा निश्वास सोडला.

या निवेदनात देण्यात आलेल्या मागण्या दुष्काळाचा आक्रोश व्यक्त करत शेतकऱ्यांनी शासन व लोकप्रतिनिधींच्या नावान बोंब मारून आंदोलन केले. पीक पंचनामे करावेत, दुष्काळ जाहीर करावा, पीक विमा वितरित करावा, दावणीला चारा द्यावा, याप्रमुख मागण्या होत्या. यावेळी झोपलेला शासनाला व प्रशासनाला जागे करण्यासाठी झोपा आंदोलन केल. यावर्षी पडलेला दुष्काळ हा यापूर्वी कधीही नव्हता एवढा तीव्र आहे. तरीही शासनाकडून व प्रशासनाकडून ज्या मागण्या पूर्ण होण गरजेच होत.  त्या मागण्या अद्यापही पूर्ण झाल्या नसून शेतकरी व पशुधन वाचवण्यासाठी सरकारन लवकरात लवकर ठोस निर्णय घ्यावा व निवेदनातील मागण्या त्वरीत मंजूर कराव्यात. या मागण्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत .

Leave a Comment