बिअर ग्रील्ससोबत रजनीकांत झळकणार डिस्कव्हरी चॅनेलवर; बिअरकडून ट्विटर अकाउंटवरुन घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच बेअर ग्रील्स या धाडसी निसर्गप्रेमी भटकंत्याबरोबर जंगलसफारीचा आनंद लुटला होता. या जंगलसफारीमुळे ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’ या टीव्हीवरील मालिकेत नरेंद्र मोदी झळकले होते. आता त्याच प्रकारचं काम दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी केलं आहे. बेअर ग्रील्ससोबत ‘इंटू द वाईल्ड विथ बेअर ग्रील्स’ या डिस्कव्हरी चॅनेलवरील कार्यक्रमात रजनीकांत दिसणार आहेत.

चाहत्यांसाठी ही मोठी खुशखबर असून चाहते या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नरेंद्र मोदींसोबत केलेल्या कार्यक्रमामुळे आम्हांला तब्बल साडेतीन अब्ज लोकांनी प्रतिसाद दिल्याचं बेअर ग्रील्स आपल्या ट्विटमध्ये म्हणाला आहे.

मोदींसोबतचा भाग उत्तराखंड येथील जिम कॉर्बेट पार्कमध्ये चित्रीत करण्यात आला होता. तर रजनीकांत यांच्यासोबतच चित्रीकरण कर्नाटक येथील बांदीपुर टायगर रिझर्व येथे करण्यात आलं आहे.

 

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

 

Leave a Comment