स्वाभिमानीच्या कार्यकर्त्याला मारहाण : आ. सदाभाऊ खोत यांच्या मुलासह चौघांवर गुन्हा दाखल

सांगली | आमदार सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोतसह चौघांनी वाळवा तालुक्यातील तांबवे येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रविकिरण माने या कार्यकर्त्याच्या घरात घुसून चाकू, तलवारी, गुप्ती घेऊन लाथा बुक्क्यांनी मारहाण केली आहे. सोमवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फर्यादीत म्हटले आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते रविकिरण राजाराम माने (वय- 35) यांनी कासेगाव पोलिसांत तक्रार दिली आहे. कासेगाव पोलिसात सागर खोतसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहीती अशी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा वाळवा तालुका युवक आघाडीचा मी अध्यक्ष आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकरी आंदोलन व संघटनेचे काम करतो. या कारणाने रयत क्रांती संघटनेचे कार्यकर्ते माझ्यावर चिडून होते.

रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत यांचेवर शेतकरी हितावरुन टिका केलेचा राग मनात धरून माझ्यावर हल्ला केला. यावेळी तु सदाभाऊंच्यावर टिका करतोस. तुला मस्ती आली आहे”. असे म्हणून शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावेळी भास्कर विष्णु मोरे व विश्वास वसंत जाधव यांनी विरोध केला. परंतु चौघांनी धक्काबुक्की करुन ढकलून दिले .आरडाओरडा केल्यानंतर ते घरातुन बाहेर गेले. या घटनेची तक्रार कासेगाव पोलिसात दिली आहे. याबाबत कासेगाव पोलिसांत घरात घुसून मारहाण करणे,जाणीव पूर्वक मारहाण करणे, शांतता भंग करणे व धमकावणे असे विविध गुन्हे दाखल झाले आहेत.

You might also like