फडणवीसांच्या कार्यक्रमाला गैरहजेरी लावत पंकजा मुंडेंनी साजरा केला श्वानाचा वाढदिवस; Video केला शेअर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे या पक्षात नाराज असल्याची चर्चा सुरु आहेत. दरम्यान, या चर्चेला आता आणखी एका घडलेल्या घटनेमुळे उधाण मिळालेले आहे. आज बीडमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत एक कार्यक्रम पार पडला. मात्र, या कार्यक्रमाला गैरहजर राहत मुंडे भगिनींनी आपल्या लाडक्या श्वानाचा वाढदिवस साजरा केला. तसेच त्याचा व्हिडिओही इंस्टाग्रामवर शेअर केला.

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांनी आपल्या श्वानाचा वाढदिवस साजरा केला आहे. त्यांनी वाढदिवसाची शेअर केलेली इंस्टाग्रामवरील पोस्ट व्हायरल झाली आहे. फडणवीसांच्या कार्यक्रमाला गैरहजेरी लावत पंकजा मुंडे यांनी इंस्टाग्रामवर टाकलेली श्वानाच्या बर्थडेची पोस्ट यातून त्यांना नेमकं काय सांगायचे आहे? याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात केली जाऊ लागली आहे.

https://www.instagram.com/p/Cm0-xvZBNVc/

भाजपमधील ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यसनमुक्ती रॅलीचे अनुषंगाने बीड शहरांमध्ये आले होते. मात्र, त्यांच्या कार्यक्रमाला महत्व देण्यापेक्षा पंकजा व प्रीतम मुंडे यांनी आपल्या श्वानाचा वाढदिवस साजरा करण्यास पसंती दिली. तसेच त्यांनी जो इंस्ट्राग्रामवर व्हिडीओ शेअर केला त्याची चांगलीच चर्चा होत आहे.