संतापजनक ! सख्ख्या मामानंच अल्पवयीन भाचीला दिल्या ‘या’ नरकयातना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीडमधील परळी या ठिकाण मामा आणि भाचीच्या नात्याला काळिमा फासणारी एक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये सख्ख्या मामानेच आपल्या भाचीवर अत्याचार केल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा नराधम मामा एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने या अत्याचारास विरोध करणाऱ्या पीडितेच्या आईला देखील मारहाण केली आहे. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात पोस्को कायद्याअंतर्गत नराधम मामावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या हा आरोपी मामा फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

परभणी जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या मात्र कामानिमित्त परळी तालुक्यातील धारावती तांडा परिसरात आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पीडित मुलीची आई आपल्या भावाकडे राहते. या महिलेला तिच्या पतीने सोडून दिले आहे. ही महिला वीटभट्टीवर मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. या महिलेच्या असह्य परिस्थितीचा गैरफायदा घेत तिच्या अल्पवयीन मुलीवर नात्यातील सख्या निर्दयी मामाने अत्याचार केले आहेत.

हा नराधम मामा केवळ अल्पवयीन भाचीवर अत्याचार करून थांबला नाही तर त्याने या अत्याचारास विरोध करणाऱ्या आपल्या बहिणीलादेखील मारहाण करत होता. या आरोपी नराधम मामाविरोधात परळी ग्रामीण ठाण्यात गुरनं 99/2022 कलम 376, 376(2)(फ), 376 (2) (जे), 376 (2) (एन), 323, 324, 504, 506 भादवी, कलम 3, 4,12 बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा करण्यात आला आहे. आरोपी मामा सध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

Leave a Comment